Posts

सोनगड आणि पर्वतगड..अविनाश असं चैतन्य (Trek to Songad and Parvatgad)

Image
पाऊस जरा रुजायला लागला की आपल्याकडे आळंबीसारखे अगणित ट्रेकर्स प्रत्येक शनिवार-रविवारी उगवतात. मुंबई-पुण्याच्या आसपास असलेल्या गड-किल्ल्यावर तर जत्रा भरते आणि मग काही ऐकू नये अश्या गोष्टी कानावर येतात. आम्ही या जत्रांमध्ये न बावरता, पावसाचा अंदाज घेऊन लहानमोठे आणि एकाकी ठिकाणं शोधतो. यावेळी आम्ही सिन्नरची सोनगड आणि पर्वतगड ही जोडगोळी निवडली. गड लहान असल्याने मुलांनाही घेऊन जायचं ठरवलं आणि म्हणून मग गेल्या आठवड्यात पावसाने घातलेलं रेड-ऑरेंजच थैमान लक्षात घेवून चारचाकी घेऊन जाण्याचा बेत केला. एक जुना मित्र, अविनाश पण जॉईन झाला आम्हाला या वेळी. माझ्या मुलीने माघार घेतली, कारण आलेला वायरल आणि आईचा ताप! सकाचिनचा चैतन्य होता बरोबर. असे आम्ही चारजण, चारचाकीवर पहिल्यांदाच, दोन लहान किल्ले करायला निघालो. खरंतर गेल्या रविवारचा प्लॅन होता पण या दिवशी मी सहकुटुंब गटारीला प्राधान्य दिलं कारण आजच्या/पुढच्या रविवारी एकादशी होती! सचिनच्या शिव्या खाल्ल्या पण... असतात काही गोष्टी ट्रेकपेक्षा चविष्ट!! शनिवारी रात्री ११.३० च्या दरम्यान गाडी गेटच्या बाहेर निघाली आणि नाशिकमार्गे सिन्नरच्या पुढे एका ...

केंजळगड/मोहनगड, १० वर्षांपूर्वी राहून गेलेला (Trek to Kenjalgadh)

Image
डंपर थांबला अचानक एका घरासमोर.  - मामी... ए मामेय... हा घे! मस्त झणझणीत रस्सा कर, येतोच बघ परतून।.... सोडवून घे शिवा कडून! सीटच्या मागचा, दोन-एक किलोचा कोंबडा खिडकीतून बाहेर देऊन ड्रायव्हर, घरातून धावत बाहेर आलेल्या म्हातारीला म्हणाला. - मी करत नसते आता, उगाच....शिवा हाय व्हय इथं? - कायबी बोलतेस व्हय, स्वतः बघितला त्याला इथं मागचं. बोलऊन घे त्याला, येतोय बघ मी परतून.. डपंर निघाला. - आजोळ हाय माझं, आईच-मामाचं घर! एकाच गावात दोन्ही आहे बघा माझं, हे इथं माझं घर, ते माझं पोरगं! रस्त्याच्या कडेला असलेल्या दुसऱ्या एका घराकडे इशारा करून साहेब म्हणाले. - उतरा इथंच! गणपतीचं दर्शन घ्या, लय फेमस हाय, ऐकलं असेल 'वाईचा गणपती' म्हणून! मागून जुन्या पुलावरून जावा एसटी स्टँड वर, जवळ पडल. ३.३०/४ च्या दरम्यान निघतात गाड्या मुंबईकडे...का येताय परत, कोंबडं दिलंयच घरी. रस्त्याने चालत राहायचं, येणाऱ्या गाड्यांना हात दाखवायचा, भेटेल त्या गाडीने, टेम्पो/ट्रकच्या मागे, वडाप गाड्यांना लटकून प्रवास करायचा, खूप वर्षांनी असा ट्रेक केला, एक वेगळीच मजा असते याची. केंजळ उतरून खावली गावातून चालताना हे महाशय थां...

कोकणसफर....पूर्णगड, रत्नदुर्ग, जयगड आणि देवघळी, गणपतीपुळे (Visit to Purngad, Randurg, Jaigad and Devghali and Ganpatipule)

Image
"अरे काही नाही सहज क्युरूओसीटी होती म्हणून फोन केला! 31stला तू गोव्यात नक्की काय करत असशील?" - नरेश बने (एक जीवश्य कंठश्च) हाच प्रश्न खरंतर मलाही पडला होता कारण आपण पु.लं.च्या 'सखाराम आप्पाजी गटणे' यांचे अनुयायी; "उत्तेजक पेयांपासून पहील्यापासून अलिप्त !" पण गृहस्थाश्रमात, पुरुषवर्गातील प्रत्येकाला आपल्या गृहदेवतेला प्रसन्न ठेवण्यासाठी फक्त वर्षाअखेरीस नाही तर ३६५ दिवस अश्या तडजोडी कराव्याचं लागतात, इच्छेविरुद्ध असल्या तरीही !! असो, आपण विषयाकडे वळू सध्या; पुरुषजातीच्या व्यथा मांडण्यासाठी निवांत 'बसू' कधीतरी... एक -  अगवाडा किल्ला, "हा किल्ला; इथेच त्या 'दिल चाहता है' च्या त्या फेमस गाण्याची शुटिंग झालेली." गोव्यात जाणाऱ्या सगळ्या पर्यटकांना तिथल्या गाईडांनकडून दिली जाणारी अतिशय उपयुक्त अशी माहिती आणि बहुतेक यामुळेच इथे गर्दी जमते. दोन - जयगड, विजपुरकरांनी १६व्या शतकात बांधलेला पण संगमेश्वर येथील नाईकांनी जिंकून खूप वर्ष पोर्तुगीज आणि विजापूर यांच्या स्वाऱ्या रोखून नेटाने राखलेला. सरतेशेवटी १८१८ मध्ये इंग्रजांनी काबीज केलेला. इथ...