Posts

पर्वतगड (हडसर) आणि शिवनेरी (Trek to Hadsar and Shivneri)

Image
खुटीच्या वाटेने अजिबात जाऊ नका. कालच एकाचा पंचनामा आटोपून आलोय आम्ही!....नसता आमच्या डोक्याला ताप! दूध संकलन केंद्रातील मामांनी आम्हाला ठणकावून सांगितलं. हवा खूपच जोरात वाहत होती आणि खुटीची वाट पण पावसामुळे बुळबुळीत झाल्याचं जमलेल्या सर्वांनीच आम्हाला सांगितलं. त्यात एका पराक्रमी पुरुषाने, गेल्याच आठवड्यात आपली आहुती दिली होती! मग काय खुटीच्या वाटेनं वर चढून, पायऱ्यांनी उतरण्याचा आमचा प्लॅन आम्हाला हडसरच्या दूध संकलन केंद्रात बदलावा लागला. तब्बल साडेतीन तासांची बाईक राईड संपवून, माळशेज घाटाचं गाढ धुकं आणि पाऊस अंगावर घेऊन, सकाळी ८.३० च्या सुमारास आम्ही हडसर गावच्या एका घरातील दूध संकलन केंद्रात जमलेल्या काका-मामांना वाट विचारात उभे होतो. हडसर म्हणजेच पर्वतगड! पुण्यातील, जुन्नर तालुक्यातील नाणेघाटापासून सुरू होणाऱ्या किल्ल्यांच्या माळेतला एक सूंदर मणी. जुन्नरजवळच्या माणिकडोह धरणावरून नाणेघाटाच्या दिशेने घाटघर गावाकडे एक रस्ता जातो. या रस्त्यावरच हडसर गावाच्या डोक्यावर हा अनगड किल्ला आहे. हा जुन्नरपट्टा म्हणजे अलौकीक निसर्गसौंदर्य; नाणेघाटा पासून सुरुवात करून जीवधन , चावंड, शिवनेरी...

सफर तळगड, घोसाळगड आणि कुडा लेण्यांची (Trek to Talgad, Ghosalgad and Kuda Caves)

Image
रघुनाथ बल्लाळ(कोरडे) सबनीस सात पाच हजार मावळे खळक पाइचे घेऊन राजापुरीवर चालिले त्यांनी जाऊन राजापुरी पावेतो तळे, घोसाळे कुल देश मारुन सरद दरियाकिनारा मोकळा केला. - सभासद बखर प्राचीन काळापासून कोकणातील मादांड बंदरात उतरणारा माल कुंडलिका नादिमार्गे घाटमाथ्यावर नेला जात असे. या व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी  तळगड, घोसाळगड, अवचितगड, ताम्हणघटमार्गे घनगड असे किल्ले बांधण्यात आले. हे सारेच किल्ले आजही आपल्या इतिहासाची साक्ष देत उभे आहेत.  शिवाजी राज्यांनी १६४८ मध्ये आदिलशहकडून तळगड घेतला. याचबरोबर निजमाकडून घोसाळगड जिंकून राजांनी त्याला 'विरगड' असं नाव दिलं. पुढे १६५९ मध्ये सिद्दीने तळगड आणि घोसाळगडला वेढा घातला, पण महाराजांनी अफजल खानाचा वध केल्याची बातमी ऐकून सिद्दीला वेढा उठवून निघून जावं लागलं.  पुरंदरच्या तहामध्ये राजांनी जे १२ किल्ले आपल्याकडे ठेवले त्यात ‘ तळगड, घोसाळगड’ हे किल्ले होते, त्याचवरुन या गडाचे तत्कालीन महत्व लक्षात येते. अवचितगड गेल्या वर्षी केला; घनगड, ताम्हिणीघाट अगोदरच केला होता. हे दोन्ही; तळा-घोसाळा, गेल्यावेळी राहून गेले होते; म्हणून या ...

पद्मदुर्ग...अजिंक्य जंजिऱ्यावरची जरब! (Padmdurg, Murud)

Image
- पुढची वारी कुठे?? - पद्मदुर्ग ! - किल्ला आहे का हा? कुठे? - अरे..जंजिरा पाहीलाय का? तिथेच आहे, बाजूला! - जंजिरा...दोनदा गेलोय...मराठयांच्या दोन्ही महाराज्यांना घेता नाही आला तो सिद्दीचा अजिंक्य किल्ला ना...त्याच्या बाजूचा तो लहानसा किल्ला का! असा....जंजिरा आजही अजिंक्यच राहिला आहे आणि खुद्द राजांनी बांधलेला पद्मदुर्ग मात्र...अपरिचित! पनवेल पासून लावलेले जंजिऱ्याचे मार्गदर्शक फलकांनी (राज्यांच्या फोटोबरोबर) त्याला प्रसिद्धी मिळवून दिली पण बाजूचाच  पद्मदुर्ग  मात्र दुर्लक्षित राहिला. जंजिरा...नो डाऊट..अभेद्य किल्ला, आजही जोमाने उभा असलेला पण..माझ्या लेखी...त्याचा अभेद्यपणा इतिहासात उभा राहिलाय तो फक्त धाडसी आणि कडव्या मराठ्यांच्या धडकेमुळेच.... राज्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर...'पद्मदुर्ग वसवून राजापूरीच्या (जंजिरा) उरावरी दुसरी राजापूरी केली आहे’. जंजिऱ्याच्या सिद्दीच्या कोकणाला होणाऱ्या उपद्रवला आळा घालण्यासाठी राजांनी मुरुडजवळ टेकडीवर 'सामराजगड' बांधला. या किल्ल्याने सिद्दीच्या जमिनीवरील हालचालींवर नियंत्रण आले आणि समुद्रातील हाल...