पर्वतगड (हडसर) आणि शिवनेरी (Trek to Hadsar and Shivneri)
खुटीच्या वाटेने अजिबात जाऊ नका. कालच एकाचा पंचनामा आटोपून आलोय आम्ही!....नसता आमच्या डोक्याला ताप!
दूध संकलन केंद्रातील मामांनी आम्हाला ठणकावून सांगितलं. हवा खूपच जोरात वाहत होती आणि खुटीची वाट पण पावसामुळे बुळबुळीत झाल्याचं जमलेल्या सर्वांनीच आम्हाला सांगितलं. त्यात एका पराक्रमी पुरुषाने, गेल्याच आठवड्यात आपली आहुती दिली होती! मग काय खुटीच्या वाटेनं वर चढून, पायऱ्यांनी उतरण्याचा आमचा प्लॅन आम्हाला हडसरच्या दूध संकलन केंद्रात बदलावा लागला.
तब्बल साडेतीन तासांची बाईक राईड संपवून, माळशेज घाटाचं गाढ धुकं आणि पाऊस अंगावर घेऊन, सकाळी ८.३० च्या सुमारास आम्ही हडसर गावच्या एका घरातील दूध संकलन केंद्रात जमलेल्या काका-मामांना वाट विचारात उभे होतो.
हडसर म्हणजेच पर्वतगड! पुण्यातील, जुन्नर तालुक्यातील नाणेघाटापासून सुरू होणाऱ्या किल्ल्यांच्या माळेतला एक सूंदर मणी. जुन्नरजवळच्या माणिकडोह धरणावरून नाणेघाटाच्या दिशेने घाटघर गावाकडे एक रस्ता जातो. या रस्त्यावरच हडसर गावाच्या डोक्यावर हा अनगड किल्ला आहे. हा जुन्नरपट्टा म्हणजे अलौकीक निसर्गसौंदर्य; नाणेघाटा पासून सुरुवात करून जीवधन , चावंड, शिवनेरी, लेण्याद्रि, हडसर आणि हरिश्चंद्रगड अशी दुर्गांची खाणचं! माणिकडोह धरण ओलांडले, की एका बाजूला धरणाचे मातकट पाणी आणि दुसऱ्या बाजूला हिरव्यागार झालेल्या उंच डोंगररांगा यामधून होणारा हा प्रवास वेगळय़ाच जगात घेऊन जातो. खरंतर, सह्याद्रीच्या या भूगोलावरचं आपला इतिहास उभा आहे.
महाराष्ट्राच्या दुर्गसंपदेचा अभ्यास करायचा असेल तर तब्बल दोन हजार वर्षांपूर्वीच्या सातवाहन काळापासून सुरवात करावी लागेल. हडसर ही त्यांचीच एक निर्मिती. जुन्नर म्हणजे सातवाहनांची बाजारपेठ! या राजवटीतच नाणेघाट या व्यापारी मार्गाची निर्मिती करण्यात आली. या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठीच जीवधन, चावंड, हडसर, शिवनेरी या किल्ल्यांची उभारणी करण्यात आली. सातवाहन नंतर यादव यांचे राज्य या गडावर नांदले नंतर परकीय आक्रमणात हा किल्लाही पारतंत्र्यात गेला. याच्या इतिहासाला पुन्हा जाग आली ती थेट इसवी सन १६३७ मध्ये. ज्या पाच किल्लयांच्या मदतीने शहाजीराजांनी स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला, त्यामध्ये या हडसरचा समावेश होता. शिवकाळात हा किल्ला फारसा दिसला नाही. पेशवाईत हा गड मराठय़ांकडेच असल्याच्या नोंदी आहेत. शेवटच्या मराठे-इंग्रज युद्धापर्यंत त्यांच्याकडेच होता. इसवी सन १८१८ च्या या युध्दावेळी मेजर एल्ड्रिजने जुन्नर जिंकल्यावर जुन्नरचा किल्लेदार हडसरवर आश्रयाला आला होता. मग इंग्रजांनी गडाला वेढा घातला आणि २५ एप्रिल १८१८ रोजी या गडाचा हा इतिहासकाळ संपुष्टात आला. ह्या इतिहासाच्या उरलेल्या अवशेषांना पाहण्यासाठी आम्ही हडसर गावं गाठलं होतं.
मामांनी ताकीद दिल्याप्रमाणे आम्ही पायऱ्याची सोपी वाट निवडली. गडाचा काळा कातळ समोर ठेवून आम्ही डावीकडे चालायला सुरुवात केली. वाटेत एका विहिरकडून वर चढत गेल्यावर एक लहानसे पठार लागले. या पठारावरून डावीकडे डोंगराला वळसा मारून आम्ही खिंडीत पोहोचलो. एका लहानशा पठारावर पोहोचताच हवेचा खरा अंदाज आम्हाला यायला लागला. सरावामुळे डोंगरकड्यावरून सपासप चालणारी पावलं आता बेबीस्टेप्स घेऊ लागली होती. पाउल टाकायला उचलताच माणिकडोहाच्या दिशेने येणारी हवा १५०० हॉर्सपॉवर ने डोंगराकडे फेकत होती. हवा इतकी होती की, डोंगरावरून जमिनीकडे झेपावणारे पाणी पुन्हा डोंगराकडे झेपावत होतं. हवेची ही पुशबॅक पावर पाहून, खुंटीची वाट नं घेतल्याचं समाधान वाटलं आणि पुन्हा एकदा गावकऱ्यांच्या अनुभवाने चालण्याचा ट्रेकिंगचा रुल मनात ठाम झाला. असो, या वाटेने डोंगराला वळसा घालून, आम्ही एका खिंडीत पोहोचलो होतो. हडसर हा खरतर दोन डोंगरांवर वसला आहे. पूर्वेच्या माणिकडोह धारणच्या बाजूचा लहानसा डोंगर आणि पश्चिमेला मुख्य किल्ला. या दोन डोंगरांच्या घळीतून पुढे चालत गेलो आणि खोदीव पाय-या नजरेस पडल्या. पायऱ्या आणि समोर दिसणारी बुरुजाची तटबंदी पहिली आणि तोंडातून एकचं शब्द आला आम्हा दोघांच्याही; वा!! या पायऱ्या चढून गेलो आणि मग किल्ल्याचा पहिला दरवाजा नजरेस पडला. पायर्यांना वळसा घालुन, कातळात खोदलेल्या दरवाजा आजही खडा आहे. या दरवाज्याने पुढे जाताच आम्ही पिर्वेकडाच्या लहान डोंगराच्या माथ्यावर होतो. ईथुन माणिकडोह फार सुंदर वाटतं होता. या डोंगरावर एक पाण्याचं टाकं आणि काही अवशेष आहेत ते पाहून आम्ही पुन्हा मागे आलो आणि डावीकडे वळून सर्पाकृती पायऱ्यांना लागलो. वैशिष्ट्य म्हणजे या पायऱ्या दगडाने झाकलेल्या आहेत अगदी बसगडाच्या पायऱ्यांनसारख्या. या पायऱ्या पार करून आम्ही मुख्य दरवाज्या जवळ येऊन ठेपलो आणि तो पार करून आम्ही गडमाथा गाठला. गडाच्या दोन्ही दरवाज्यांमगे पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत पण त्यात गावकऱ्यांची गुर सध्या विसावा घेतात. गडावर पोहोचताच पाहिलं पाण्याचं टाकं लागलं त्याला लागूनच एक लहानशी पिंड कोरलेली होती. डावीकडे पुढे चालत जाताना आजून एक टाकं आणि मोठा तलाव लागला, त्याच्या एका टोकाला एक वास्तू संशोधनाच्या प्रतीक्षेत दिसली. तलावा समोरच शिवमंदिर आहे बाहेर मोठा नंदी विसावलेला आहे. मंदिरातील पिंडीजवळ एक मिणमिणता दिवा तेवत होता. एक साधू भेटले इथे, म्हणाले; 'देवाने जसे ठेवलंय तसंच राहायचं!' ....सुंदर ओळ अगदी विरुद्ध आपल्यासारखा घडाळ्याच्या काट्यांवर धावणार्यासाठी. मंदिराच्या सभामंडपात एकीकडे गणपती आणि मारुती बसवले आहेत. मंदिरात हॅट जोडून आम्ही किल्ल्याच्या पश्चिम बुरुजाकडे निघालो. खुंटीची वाट याच बुरुजावर घेऊन येते. बुरुजा जवळच एक पाण्याचे टाके, देवीचे एक लहानसे उध्वस्त मंदिर, हनुमानाच्या मंदिराचा चौथरा आहे. बुरुजाची तटबंदी बरीचशी शाबुत आहे. इथून माणिकडोह जलाशयाचा सह्यप्रदेश मन वेधून घेत होता. आता आम्ही शिवमंदिराजवळ आलो, इथून डाव्या बाजूला काही धान्यकोठारे आहेत त्यात सध्या गुरं विसावा घेतात. इथे आमची किल्लेफेरी संपवून हडसर गाव गाठलं. त्या दुधकेंद्रात पावशेर धारोष्ण दुधाची चव घेतली..खूप दिवसांनंतर. विदाऊट साखर के गोडी होती त्याची! चव अजूनही आहे जिभेवर. बाईक स्टार्ट केली आणि शिवनेरीच्या दिशेने कूच केली.
आजचा दुसरा किल्ला, निमगिरी किंवा शिवनेरी करायचा होता. निमगिरी थोडा लांब होता हडसर पासून मग ५-१ किमीवर असलेला शिवनेरी करायचं ठरवलं, वेळेचं गणित जमवण्यासाठी.
शिवनेरी, राजाचं जन्मस्थळ म्हणून बघायची खूप इच्छा होती पण या 'पर्यटन स्थळी' भेट देऊन हिरमुस झाला. सरकारने चांगल काम केलं आहे इथे, पायऱ्या बांधल्या, दरवाजे बसवले, बागा केल्या...चांगल्या उद्देशाने पण इथे लोक येतात ते पिकनिकला किंवा लव्हर्स पॉईंट म्हणून. या सधनांमुळे झालेल्या अपार गर्दीत, इतिहास हरवला आहे किंवा दिसेनासा झालाय इथे. शिवजन्मची इमारत पाहत होतो... तेव्हा एक विशीतला चमू या इमारतीच्या झरोक्यांवरून वाकून अर्वाच्य भाषेत पाणचट टोमणे मारत होता खलील लोकांना उद्देशून...कहर म्हणजे यातील प्रत्येकाने कपाळी शिवगंध धारण केला होता... याच इमारतीत व्यवसाय करणाऱ्या एका ईसमाकडून...किंमत फक्त रुपये दहा!.... अरे काय हे; कुठे आहोत आपण; काय करतोय; कुठे चाललोय!
मागे फिरताना पुन्हा तोच प्रश्न...स्वराज्याचा इतिहास सांगणारे आमचे हे किल्ले सोपे व्हावे की जसे होते तसेच अनवट राहावे...
वैभव आणि सचिन.

Comments
Post a Comment