Posts

मोरोशीचा भैरव...(Trek to Bhairavgad, Moroshi)

Image
डाईक... म्हणजे बेसॉल्ट खडकाची उभी भिंत. ज्वालामुखीचा लाव्हारस वैशिष्टपुर्ण पद्धतीने बाहेर उडून; थंड होऊन तयार झालेला कातळकडा.  सह्याद्रीची रचनाच मुळी ज्वालामुखिच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लाव्हारसामुळे झालेली आहे. यातील 'डाईक' पद्धतीच्या पर्वतरचनेच उत्तम उदाहरण म्हणजे 'मोरोशीचा भैरवगड'....आमची आजची मोहीम... भैरवगडच्या बालेकिल्ल्याची ४०० फूट उंचीची, मुख्य डोंगररांगेतून वेगळी उभी राहिलेली अजस्त्र आणि खडी कातळभिंत नेहमीच आमचे लक्ष वेधून घ्यायची. पण जरा जास्तच टेक्निकल असल्यामुळे आम्ही दोघांनी(फक्त) हात टाकायची रिस्क घेतली न्हवती. सरतेशेवटी आम्ही या ट्रेकसाठी 'स्मॉल स्टेप ऍडव्हेंचर' (http://www.smallstepsadventures.com) चा इव्हेंट जॉइन करायचं ठरवलं आणि अनेक वर्षांची इच्छा पूर्ण करून रविवार सार्थकी लावला. अगोदर ठरल्याप्रमाणे सकाळी ५.३० ला मोरोशी गाव गाठण्यासाठी ४ च्या ठोक्याला घर सोडलं. डोंबिवली वरून जवळजवळ ७८ किमीवर, कल्याण-मुरबाड-माळशेज रस्तावर हे गाव आहे. बाईकवर असताना सकाळी ४.३० पासूनच, विनायक (ट्रेक लीड) चे फोन यायला सुरुवात झाली. जवळपास १०...

अवचितगड आणि बिरवाडी...कोंकण किल्ले....(Trek to Avchitgad and Birvadi fort)

Image
****, साप गेला पायावरून!!.. एका सेकंदात पास झाला!!.... भीती वाटायला पण वेळ नाही मिळाला... (सचिन आणि मी - फोनवर) अवचितगडाची वाट शोधताना, आतापर्यंतच्या ट्रेक मध्ये पहिल्यांदाच एखाद जनावर अंगावरून गेलं माझ्या. अस्सल, ४-१ फूट असेल..करड्या रंगाचं.. अवचितगड चढायला सुरवात केली आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये किल्ल्याच्या कातळाकडे तोंड देणारी, डावीकडची वाट धरली. खरी वाट गडाच्या सोंडीवरून उजवीकडून जात होती. या फसव्या वाटेने थोड्याच वेळात आमची साथ सोडली पण आम्ही हुशार!...घुसलो झाडीत आणि अर्ध्या तासात उभी चढाई करून कातळाच्या छातीला आलो. आता पुढे कुठेच अप्रोच दिसत नव्हता. किल्ल्याचा माथा डोक्यावर दिसत होता आणि खाली परत उतरून वाट शोधायला वेळ नव्हता आमच्याकडे, ३ किल्ल्याचं टार्गेट होत आमचं आज. म्हणूनच रोप जवळ नसतानाही, तो ५० फुटी कातळ उभा चढायचं ठरवलं. सचिन...उंची ५ फूट, वजन साधारण ५५ किलो...काटक...सारड्या सारखा चढला. मी; ५.९ फूट, ८१ किलो....जड...१०-१५ फूट चढलो आणि मग ग्रीप मिळत नव्हती रॉकवर. उतरलो खाली आणि डावीकडुन, त्याच कातळात दुसरा सोपा रूट शोधायला वाट काढत राहिलो. ५-१ मिनिटं, त्या कातळाला प्रद...

भास्करगड/बसगडाच्या पायऱ्या...(Trek to Bhaskar gad/Basbad)

Image
- 31st चा काय प्लॅन??...कुठे बसायचं?? - खरंच यार, जवळजवळ एक महिना झाला...चल प्लॅन करू काहीतरी!!! आणि... रविवार; 31st Dec; आंग्लवर्षाचा शेवट.... सुवर्णकांचंन योग... सकाळी, ७ वाजता, घाटणदेवी मंदिरात हात जोडून, थंडीत कुडकुडत आम्ही उभे!!...खरंच, डोक्यावर पडलोयत का आम्ही??? आमच्या महाराष्ट्रात-सह्याद्रीत, गड-किल्ल्यांची कमी नाही! आणि त्यात भटकणाऱ्या मावळ्यांचीही!...काही गड नावाजलेले/फेमस....आणि खूप सारे...दुर्लक्षित! 'हरिहर' असाच एक नावाजलेला आणि बाजूचा 'भास्करगड' दुर्लक्षित...कॉलेजातल्या अगणित सुंदर बालांमध्ये...एखादी फार देखणी नाही पण सावळी-नीटस-सुबक-ठेंगणी असते, अगदी तसंच... आणि आम्हीही.....तिथेच भुलतो!!! 31st कोणत्यातरी गडावरच करायचं ठरलं; शनिवारी रात्री उशिरा 'भास्करगड' फिक्स झाला. नाशिकाच्या पश्चिमेकडे आणि इगतपुरीच्या उत्तरेला 'त्रंबक डोंगररांगेच्या दक्षिण टोकाला भास्करगड उभा आहे. लोकल नाव 'बसगड'..का ते त्याचा घेरा पाहून कळलं! कल्याण-कसारा-इगतपुरी वरून त्रंबकेश्वरकडे जाणाऱ्या वाटेवर 'निरगुडपाडा' हे गडाच्या पायथ्याचं...