अवचितगड आणि बिरवाडी...कोंकण किल्ले....(Trek to Avchitgad and Birvadi fort)
****, साप गेला पायावरून!!..
एका सेकंदात पास झाला!!....
भीती वाटायला पण वेळ नाही मिळाला...
(सचिन आणि मी - फोनवर)
अवचितगडाची वाट शोधताना, आतापर्यंतच्या ट्रेक मध्ये पहिल्यांदाच एखाद जनावर अंगावरून गेलं माझ्या. अस्सल, ४-१ फूट असेल..करड्या रंगाचं..
अवचितगड चढायला सुरवात केली आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये किल्ल्याच्या कातळाकडे तोंड देणारी, डावीकडची वाट धरली. खरी वाट गडाच्या सोंडीवरून उजवीकडून जात होती. या फसव्या वाटेने थोड्याच वेळात आमची साथ सोडली पण आम्ही हुशार!...घुसलो झाडीत आणि अर्ध्या तासात उभी चढाई करून कातळाच्या छातीला आलो. आता पुढे कुठेच अप्रोच दिसत नव्हता. किल्ल्याचा माथा डोक्यावर दिसत होता आणि खाली परत उतरून वाट शोधायला वेळ नव्हता आमच्याकडे, ३ किल्ल्याचं टार्गेट होत आमचं आज. म्हणूनच रोप जवळ नसतानाही, तो ५० फुटी कातळ उभा चढायचं ठरवलं. सचिन...उंची ५ फूट, वजन साधारण ५५ किलो...काटक...सारड्या सारखा चढला. मी; ५.९ फूट, ८१ किलो....जड...१०-१५ फूट चढलो आणि मग ग्रीप मिळत नव्हती रॉकवर. उतरलो खाली आणि डावीकडुन, त्याच कातळात दुसरा सोपा रूट शोधायला वाट काढत राहिलो. ५-१ मिनिटं, त्या कातळाला प्रदक्षिणा मारून, एका ठिकाणी, ३-१ स्टेप मारल्या आणि एक उमद जनावर पायावरून सरसरत गेलं. नाद सोडला तिथेच आणि पुन्हा खाली उतरून वाट शोधायचं ठरवलं. सचिन वर माझी वाट बघत होता त्याचाच फोन आला. सचिनला वरून खरी वाट वरून पुसटशी दिसत होती त्या गर्द जंगलात. त्याने सांगितल्याप्रमाणे मी खाली उतरून उजवीकडे वळलो आणि पायाखाली मार्किंग सापडली अर्धा तास उतरल्यावर. या मळलेल्या वाटेने विरगळी पर्यंत आलो. सचिन पण आडवा चालत इथेच आला. किल्ल्यावर जायला, दुसरा कातळ पार करायला अँप्रोच नव्हता त्यालापण. इथून पुढे थोड अंतर पार करून आम्ही गडाच्या पूर्वाभिमुख प्रवेशद्वारासमोर-महादरवाज्यासमोर पोहोचलो.
अवचितगड. गडावर दोन वाटा येतात, एक पिंगळसई गावातून आणि दुसरी मेढयातुन. पिंगळसई गावातून जाणारी वाट किल्ल्याच्या डाव्या सोंडीवरून, पायऱ्या असणाऱ्या दक्षिण बुरुजावर घेऊन जाते. आता, आजून एक नवीन वाट पिंगळसई गावातुन पुढे जाऊन मेढाळी गावातील पंपहाऊस जवळून जाते. पिंगळसाई-मेढाळी वाटेवर दोन विहिरी लागतात, लहान विहारीजवळ पंपहाऊस आहे, येथूनच चढाई सुरू केली आम्ही. इथून किल्ला डावीकडे दिसत होता पण वाट मात्र उजविकडून फिरून सोंडीवरून घेऊन जात होती आणि ती आम्ही मिस केली. मेढयातुन येणारी वाट जिथे मिळते तिथेच काही विरगळी दिसल्या. गडावर पोहोचायला आम्हाला दिड तास लागला.
पूर्वाभिमुख महादरवाज्याचे अवशेष आजूनही बरयापैकी शाबूत आहेत. महादरवाज्याजवळ एका दगडावर शरभशिल्प कोरलेले दिसले. असे शरभशिल्प जवळजवळ प्रत्येक गडाच्या द्वारावर असते. हे शिल्प म्हणजे एक काल्पनिक प्राणी असून, द्वारावर आलेल्या शत्रूला राजाच्या ताकदीची जाणिव करून देण्यासाठी कोरलेले असते. इथून आम्ही गडफेरी सुरू केली. पहिल्यांदा उजवीकडे जाऊन बुरुज पहिला, एक भगवा डौलाने फडकत होता इथे. बुरुजावरून, कुंडलिकेच पात्र, रोहा रेल्वे स्टेशन आणि कोकण परिसर सुंदर दिसत होता. इथून पश्चिमेला एक लहानसा दिंडी दरवाजा आणि ७ टाक्याचा एक समूह आहे. एका टाक्यातील पाणी पिण्यायोग्य होते त्याचा आस्वाद घेतला. या टाक्यांजवळच पिंगळाई देवीचे/ महिषासुरमर्दिनीचे छोटेसे मंदिर आणि एक दिपमाळ आहे. इथून पुढे डावीकडे दुसरा एक लहानसा दरवाजा पार करून आम्ही गडाच्या दक्षिण बुरुजाकडे आलो, बुरुजावर चडण्यासाठी पायऱ्या आहेत. दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. तिथेच एक इ.स.१७९६ मध्ये कोरलेला शिलालेख आहे. बुरुजावरुन नागोठणे खिंड, बिरवाडी किल्ला, कुंडलिका नदीचे खोरे इत्यादी परिसर न्याहाळता येतो. गडाच्या उत्तरेकडील टोकावर एक बुरुज आहे.
गडावर ३ तोफा, वाड्यांचे चौथरे, सदर इत्यादी गोष्टी पाहाता येतात. किल्ले पाहण्याची आवड असणाऱ्यांनी जरूर पहावा असा हा एक दुर्लक्षित किल्ला आहे; तटबंदी, अवशेष, तोफा, पाण्याची टाकी मंदिरं, विरगळी..... काय नाही या किल्ल्यावर, जवळ जवळ सिंहगडाच्या तोडीचा आहे हा किल्ला.
आमचा आजचा पहिला किल्ला होता 'बिरवाडी'. तो सकाळी उरकून आम्ही अवचितगड गाठला होता. बिरवाडीचा किल्ला रोह्यापासून १८ किमी अंतरावर आहे.
डोंबिवलीतून रात्री ११ वाजता निघून जवळ जवळ ३ वाजता आम्ही रोहा-मुरुड मार्गावरिल 'चाणेरा' गावी पोहोचलो, बिरवाडी येथून १ किलोमीटरवर होते म्हणून मग बस स्टँड वर आराम केला. सकाळी ६ला उठून बिरवाडी गाठलं. लहानसा टुमदार किल्ला समोर दिसत होता. गावातून किल्ल्यावर जातांना वाटेतच भवानी मातेचे प्रशस्त मंदिर लागल. मंदिरापर्यंत जाण्यास सुमारे १०० पायर्या आहेत .देवळाच्या प्रांगणात तोफ ठेवलेली आहे. मंदिराच्या मागील बाजूस शिवरायांचा ६ फुटी पुतळा उभा आहे. येथून थोडे वर चढल्यावर आम्ही एका बुरूजापाशी येऊन पोहचलो. बुरुजापासून एक वाट उजवीकडे वळते, ही वाट संपूर्ण किल्ल्याला वळसा घालुन गडावर पोहचते. इथेच रम्य सूर्योदय अनुभवला आम्ही. वाटेत एका ठिकणी खडकात खोदलेले पाण्याचे टाके आहे. त्याला ‘घोड्याचे टाके’ म्हणतात. किल्ल्याचे वैशिष्ट्य असे की, किल्ल्याच्या चहुबाजूस तटबंदी विरहीत ७ बुरुज आहेत. गडाच्या या मागील बाजूस गडाचे सुबक असे पश्चिमाभिमुख प्रवेशद्वार आहे.आजही हे बर्यापैकी शाबूत आहे. प्रवेशद्वारातुन आत गेल्यावर डावीकडे पाण्याची ३ टाकी आहेत. येथुन पुढे गेल्यावर एक दगडी भांड दिसते.त्याच्या पुढे अजून एक टाक आहे.या ठिकाणाहून परत ३ टाक्यांपाशी येऊन, येथून थोडे वरच्या बाजुस गेल्यावर आपण थेट बालेकिल्ल्यातच प्रवेश करतो. गडमाथ्यावर पडक्या वाड्याचे अवशेष आहेत. गड छोटा असल्याने तो फिरण्यास अर्धातास पुराला आम्हाला.
रोह्याच्या अवचितगडा पासून सुरू झालेल्या डोंगररांगेत घोसाळगड, तळगड, मानगड, कुर्डुगड, बिरवाडी असे अनेक छोटे किल्ले आहेत. इतिहासात कुठेही फारसा उल्लेख नसलेला या किल्ल्यांपैकी ३ करायचे ठरवून आम्ही निघालो होतो. पण सकाळी, बाईकची हवा खूपच कमी झाल्याच लक्षात आल आणि पुढील कटकट टाळण्याकरिता हवा भरणाऱ्याची वाट बघत आम्ही जवळजवळ एक तास वाया घालवला, पर्याय नव्हता. नंतर अवचितगडावर ४५ मिनिट वाया घळवली आम्ही. म्हणून मग ३ पैकी २च टार्गेट कम्प्लिट करून संध्याकाळचा चहा घरी येऊन घेतला.
रोह्यातले पाहिलेले दोन्ही किल्ले श्रीमंत आहेत....त्यांच्या अवशेषाने, तोफांनी, निसर्गसौंदर्याने. नीट प्लॅनिंग करून एका दिवसात आवर्जून पाहून यावे असेच.
- वैभव आणि सचिन

Comments
Post a Comment