मोरोशीचा भैरव...(Trek to Bhairavgad, Moroshi)

डाईक...
म्हणजे बेसॉल्ट खडकाची उभी भिंत. ज्वालामुखीचा लाव्हारस वैशिष्टपुर्ण पद्धतीने बाहेर उडून; थंड होऊन तयार झालेला कातळकडा. 

सह्याद्रीची रचनाच मुळी ज्वालामुखिच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लाव्हारसामुळे झालेली आहे. यातील 'डाईक' पद्धतीच्या पर्वतरचनेच उत्तम उदाहरण म्हणजे 'मोरोशीचा भैरवगड'....आमची आजची मोहीम...

भैरवगडच्या बालेकिल्ल्याची ४०० फूट उंचीची, मुख्य डोंगररांगेतून वेगळी उभी राहिलेली अजस्त्र आणि खडी कातळभिंत नेहमीच आमचे लक्ष वेधून घ्यायची. पण जरा जास्तच टेक्निकल असल्यामुळे आम्ही दोघांनी(फक्त) हात टाकायची रिस्क घेतली न्हवती. सरतेशेवटी आम्ही या ट्रेकसाठी 'स्मॉल स्टेप ऍडव्हेंचर' (http://www.smallstepsadventures.com) चा इव्हेंट जॉइन करायचं ठरवलं आणि अनेक वर्षांची इच्छा पूर्ण करून रविवार सार्थकी लावला.


अगोदर ठरल्याप्रमाणे सकाळी ५.३० ला मोरोशी गाव गाठण्यासाठी ४ च्या ठोक्याला घर सोडलं. डोंबिवली वरून जवळजवळ ७८ किमीवर, कल्याण-मुरबाड-माळशेज रस्तावर हे गाव आहे. बाईकवर असताना सकाळी ४.३० पासूनच, विनायक (ट्रेक लीड) चे फोन यायला सुरुवात झाली. जवळपास १० फोन झाले आमचे आणि मग वाटलं की आमच्यामुळे उशीर होतोय ट्रेकला. आजून उशीर नको म्हणून, ट्रेकर्सचा नॅशनल ब्रेकफास्ट-पोहे स्कीप करून आम्ही इन्ट्रोडकश्यन राउंड ला उभे राहिलो (पार्टीसीपंट म्हणून). सकाळी ६ ला, २० जणांचा चमू लागला भैरवगडाच्या वाटेला. मोरोशी गावाच्या पुढे १० मिनिटं चालत, पोलीस चेकपोस्ट जवळ, रस्ताच्या उजव्या बाजूला, भैरवगडाची वाट दाखवणारी एक पत्र्याची कमान आहे, इथुन, बॅटरीच्या प्रकाशात आमची पायपीट सुरू झाली. या वाटेने थोडं पुढे गेल्यावर शेताजवळून डावीकडची वाट आम्ही पकडली. डावीकडील २ टेकड्या पार करून आम्ही गडाच्या माचीवर पोहोचलो तेव्हा सकाळचा प्रहर संपून गेला होता आणि समोरची अवाढव्य भिंत आता स्पस्ट दिसायला लागली होती. इथून पुढे डाव्या वाटेने थोडी उभी चढाई करून आम्ही या भिंतीतल्या दोन गुफांपर्यंत पोहोचलो. एक गुफेतल्या थंड पाण्याने आमची पोटं आणि बाटल्या भरून आम्ही पुढे जाऊन बालेकिल्ल्याचा पायथा गाठला. माचीपासून या खिंडीत यायला २०-१ मिनिट लागली. मोरोशीतून या खिंडी पर्यंतचा १.३० तसाचा प्रवास पूर्ण करायला आम्ही ३ तास घेतले होते; कारण सततचे हॉलट्स. असो, ग्रुप ट्रेकचा जुना अनुभव असल्याने ही वेळेची बेरीज आम्हाला नवीन न्हवती. समोर दिसणारी  वाट फारच कठीण होती. 









अनुभवी लीडर्सनी सेटअप लावायला सुरवात केली; पासिंग रोप, हारनेस, क्राब्स, बिले रोप सर्व सेटअप पूर्ण झाला तेव्हा १०.३० वाजले होते. एक-एक पार्टीसिपंट आपल्या कुवतीप्रमाणे आणि लीडर्सच्या सपोर्टने भिडला या कातळाला. पहिल्या ६०-१ पायऱ्या बऱ्यापैकी शाबूत आहेत या एका लहानश्या गुफेपाशी घेऊन जातात. गुफेत शिरणे अवघड आहे. या गुफेच्या पुढील पायऱ्या उध्वस्त केलेल्या आहेत आणि हा टप्पा पार करण्यासाठी क्लामिंग टेक्निक वापरावं लागलं. पुढच्या पायऱ्यां देखील मोठ्या प्रमाणात उध्वस्त केल्या आहेत त्यामुळे प्रत्येकजण जपून पाय टाकत होता. या पूर्ण पायऱ्या एका बाजूने कातळकडा आणि दुसऱ्या बाजूने खोल दरी अशाच आहेत. शेवटच्या काही पायऱ्या मुरूमच्या मातीने आजून रिस्की झाल्या आहेत. या पायऱ्या पार करून आम्ही एका उंचवट्यावर आलो. इकडे उजवीकडे एक पाण्याचं टाकं होत. ते पाहून डाव्या बाजूच्या वाटेने थोड्या वेळात आम्ही गडाच्या माथ्यावर पोहोचलो. पश्चिमेला नाणेघाटाचे टोक स्पष्ट दिसत होते; पूर्वेला हरिश्चंद्रगड, खराब वातावरणात पुसट झाला होता. इथे सह्यरुप डोळ्यात साठवून आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरु केला. उतरताना रॅपलिंग तंत्राचा वापर करून सगळे पुन्हा खिंडीत आलो. लिडर्स ने वाइंड अप केलं आणि मोरोशी गाव गाठायला आम्हला ४ वाजले. ढाब्यावर बसून चिकन वर आडवा हात मारून ५ वाजता सगळ्यांचा निरोप घेतला आम्ही दोघांनी.









मोरोशीचा भैरवगड एक अत्यंत कठीण ट्रेक असून यात ट्रेक बरोबर गिर्यारोहण ही करावं लागतं. सहसा कोणीही एका-दोघांनी, गिर्यारोहणाच्या सामना शिवाय प्रयत्नही करू नये असाच. पण एखाद्या अनुभवी ग्रुप बरोबर एकदा तरी भेट द्यावी असा सह्याद्रीचा एक रांगडा गडी आहे. दोघंच फिरणारे आम्ही या वेळी माणसात आलो होतो आणि त्यामुळेच आमची ही भेट अविस्मरणीय ठरली होती.

- वैभव आणि सचिन.

Comments

  1. Sachin apratiim likhan .. mala kup Anand hota ahe ki tumche sarkhe shayndri Chy mavale barobar me ha Trek kela .. bhetu phuna kadi Tari Sahyadri madech

    ReplyDelete
  2. Mast lihilal ahe. Jyani kela ahe tyancha atwani jagya hotil ani jyani nahi tyana karaychi etcha hoil. Mast

    Ravi PawarP
    wwwww.smallstepsadventures.co

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मित्रा....
      - वैभव आणि सचिन

      Delete
  3. Ekdum Mast Varnan... Bhetuch Parat....... Lavkarach

    ReplyDelete
  4. सुंदर आहे लिखाण.... मोजके आणि महत्त्वाचे....

    ReplyDelete

Post a Comment