Posts

Showing posts from 2019

कुर्डुगडाची घळ आणि घळीतून सरपटणारे आम्ही (Trek to Kurdugad/Vishramgad)

Image
बरेच दिवसांनी माझा ओरिजिनल रंग परत देणारा ट्रेक केला! मी भले त्याला 'गहुवर्ण' म्हणत असलो तरी माझ्या मित्राचं वेगळं मत आहे. 'तू आजून थोडा उजळ असतास तर आम्ही तुला काळा म्हटलं असतं!' (वर्णभेदाचा कोणताच हेतू नाही पण मित्रप्रेम आजून काही नाही). असो, मुद्दा असा की; जवळजवळ गेले सहा महिने आम्ही जे काही ट्रेक केले ते सर्व मान्सून ट्रेकचं ठरले, निसर्गाची कृपा! पण आज कुठे आम्हाला सूर्य खऱ्या अर्थाने जाणवला. रायगड जिल्ह्यातही एक 'विश्रामगड' आहे, 'कुर्डुगड' म्हणतात त्याला. ताम्हिणी घाटातून होणाऱ्या व्यापारावर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला उभा केला गेला. समुद्र मार्गाने आपला परदेशी व्यापार कित्येक वर्षांपासून चालू आहे, कोकणात उतरणारा माल ताम्हिणी, थळ अश्या मार्गाने घाटावरील बाजारपेठेत विक्रीसाठी वाहतूक केला जाई. अश्या या घटमार्गांचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले बांधण्यात आले. भिऱ्यात उगम पावणारी कुंडलीका नदी कोर्लई जवळ समुद्राला मिळते या नदीतून घाटावर जाणाऱ्या ताम्हिणी घटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. कोकणातून पुण्यात जाणाऱ्या ताम्हिणी घाटाच्...

पाबरगड, दिवाळीत केलेला मान्सूम ट्रेक....(Pabargad Trek)

Image
दिवाळी एका आठवड्यावर आहे आणि हा पाऊस मृग नक्षत्राससरखा बरसतोय. या पावसाच्या ओव्हरटाईम मध्ये कोणता किल्ला करायचा ह्या पेचात आम्ही होतो. पाबरगड खूप दिवसांपासून हेरून ठेवला होता पण पावसात करण्यासारखा नव्हता म्हणून टाळत होतो. शनिवारी रात्री बऱ्याच पर्यायांवर विचार विनिमय झाला आमचा आणि पाबरगडच ठरला एका आशेवर की तिकडे पाऊस नसेल. नेहमीप्रमाणे रात्री जमेल तेवढा अभ्यास करून आम्ही निघालो रविवारी. सह्याद्रीत भटकणाऱ्या आमच्या सारख्यांचा स्वर्ग म्हणजे भंडारदरा परिसर. रतनगड, अलंग, मदन, कुलंग, कंत्राबाईची खिंड, घनचक्कर, आजोबा आणि कळसूबाई-महाराष्ट्रातले सर्वोच्च शिखर अश्या कातळकड्यानी आणि गडांच्या अभेद्य भिंतींनी हा स्वर्ग व्यापून ठेवला आहे. यावर कमी म्हणून की काय अफाट भंडारदरा डॅम यात आजून भर घालतो. या अप्रतिम सौंदर्यामध्ये पाबरगड हा रांगडा गडी मांडी थोपटून उभा आहे आणि आज त्यालाच भेट देणार होतो. भंडारदराच्या पुढे संगमनेरच्या वेशीवर, रंधा धबधब्याच्या डावीकडे हा उंच गड आकाशाला हात लावताना दिसतो. डोंबिवली वरून जवळपास ५ तासाची बाईक राईड होती म्हणून सकाळी ४.३० लाच निघालो आणि घोटी संगमनेर मार्गे ...

आडवाटेवरचा त्रिंगलवाडी आणि जैन लेणी....(Trek to Tringalwadi fort)

Image
शुक्रवारी रात्री बंगळुरू एअरपोर्ट वर ७ वाजता पोहोचलो; ८.१० ची मुंबईसाठी फ्लाईट होती. ही विमानसेवा काही तांत्रिक  अडचणींमुळे स्पाइसजेट ने ६ तास उशिराने करून मला चांगलीच मिरची लावली होती. साला; एक तर माझं गणपतीत गावी जाणं कॅन्सल झालं होत. अगदी आदल्या दिवसापर्यंत, शनिवारी पहाटे गावी निघण्याचा प्लॅन होता पण काही अपरिहार्य (****) कारणांमुळे तो रद्द झाला आणि आता मी एअरपोर्ट वर पडून होतो. फस्ट्रेशन काढण्याचा आणि थोडा ब्रेक मिळवण्याचा एकमेव पर्याय म्हणून मी सचिनला फोन केला आणि रविवारी कुठेतरी पाय मोकळे करायचं ठरवलं. जायचं ठरलं होतं पण कुठे ते ठरलं नव्हतं. गेल्यावेळी राहून गेलेला एक ऑपशन होता पण मजा नव्हती त्याच्यात! मग काय; परीक्षेच्या आदल्या दिवशी करतात तसा रट्टा मारला आणि अगदी, रविवारी सकाळी ५ वाजता, बाईकवर बसता बसता त्रिंगलवाडीचा पेपर फुटला. त्रिंगलवाडी किंवा त्रिंगलगड; इगतपुरी पासून ९ किमी पुढे टाके गावातुन एक रस्ता त्रिंगलवाडीकडे जातो. आम्ही तो तुडवू लागलो. रस्त्याची अवस्था, कधीकाळी तो इथे असावा अशीच होती. पुढे पत्र्याची वाडी इथे एका अंगणात गाडी लावून आम्ही वाटेसाठी विचा...

किल्ले जीवधन...पावसात भिजलेला आणि धुक्यात हरवलेला...(Trek to Jivdhan Fort)

Image
या वर्षी पावसाला थोडा उशीरच झाला आणि त्यात मनसोक्त भिजायला आम्हाला पण! म्हणूनच की काय सकाळी ४.३० अंगावर घेतलेला पाऊस आम्ही संध्याकाळी घरी येईपर्यंत खेळवत ठेवलेला होता. जीवधन.... स्वराज्याच्या 'नमन' नाट्यातील, पहिला, लहानसा 'गण' शहाजी राज्यांनी इथेचं सादर केला होता. १७ जून १६३३, जेव्हा निजामशाही बुडाली तेव्हा त्यांचा शेवटचा वंशज 'मुर्तुझा' याच किल्ल्यावर कैदेत होता. तेव्हा, निजामशाहीचे सरदार शहाजीराजे भोसले यांनी मूर्तझाची सुटका करून त्याला संगमनेरजवळच्या पेमगिरी किल्ल्यावर  निजामशाह म्हणून घोषित केले. निजामशाही टिकविण्याच्या बहाण्याने शहाजीराजांचा हा स्वराज्यनिर्मितीचा प्रयत्न सुरू झाला होता. या कार्यात त्यांना विजापूरचे सरदार मुरार जगदेव हेही सामील झाले होते. कुकडी खोऱ्यातील शिवनेरी, हडसर, चावंड आणि जीवधन या किल्ल्यांच्या मदतीने त्यांनी योजलेली ही चाल मोगलांच्या लक्षात आली आणि मग हे आव्हान मोडण्यासाठी स्वत: शाहजहान दक्षिणेत उतरला. महमद आदिलशाहकरवी मुरार जगदेवची हत्या करण्यात आली. शेवटी उत्तरेच्या या प्रचंड फौजांपुढे  शहाजीराजांचा निभाव लागला नाही आणि त्...

४२ विरगळी आणि निमगिरी-हनुमंतगड (Trek to Nimgiri and Hanumant gad)

Image
वाढदिवसाच्या दिवशी तरी घरी रहा! हा उनाडपणा बस झाला आता! ५ वाजण्याच्या आत घरी नाही आलात....तर त्याचं डोंगरावर रहा! आदिवासी कुठचे!  -  इती - घराचा किल्लेदार..... उद्याच्या रविवारी, सचिनला ऑफिस मध्ये काम होतं आणि पुढचा म्हणजे महिन्यातला तिसरा रविवार, मला काही काम आहे. महिना वाया कसा घालवायचा म्हणून सचिन शनिवारी सुट्टी घ्यायला तयार झाला आणि मी माझा बर्थडे कोणत्यातरी गडावर हॅप्पी करायचं ठरवलं. '५ च्या आत घरात' यायची ताकीत होतीच म्हणून मग त्यातल्या त्यात जवळचे 'निमगिरी आणि हनुमंतगड' करायचं ठरवलं आणि सकाळी ४.३०लाच निघालो. मुरबाड-माळशेज घाट मार्गे आम्ही खंडीपाडा हे निमगिरीच्या पायथ्याचं गाव गाठलं. बाईक एका अंगणात उभी करून समोर डोंगरात दिसणाऱ्या किल्ल्यांच्या जोडगोळीची वाट धरली. शाळेच्या समोरून इलेक्ट्रिक टॉवर समोरून थोडं पुढे जाऊन एक विहीर पार करून आम्ही झुडुपात शिरलो. याच गर्द झाडीत काही विरगळी आणि हनुमानाच्या मंदिराचे अवशेष आहेत हे आम्ही वाचलं होतं पण ते परत येताना पाहू हणून आम्ही पुढे चालू लागलो. नेहमीच्या सवयीप्रमाणे वाट भटकलो आणि १५-२० मिनिट वाया घालवली. डोंगराच्य...