पाबरगड, दिवाळीत केलेला मान्सूम ट्रेक....(Pabargad Trek)
दिवाळी एका आठवड्यावर आहे आणि हा पाऊस मृग नक्षत्राससरखा बरसतोय. या पावसाच्या ओव्हरटाईम मध्ये कोणता किल्ला करायचा ह्या पेचात आम्ही होतो. पाबरगड खूप दिवसांपासून हेरून ठेवला होता पण पावसात करण्यासारखा नव्हता म्हणून टाळत होतो. शनिवारी रात्री बऱ्याच पर्यायांवर विचार विनिमय झाला आमचा आणि पाबरगडच ठरला एका आशेवर की तिकडे पाऊस नसेल. नेहमीप्रमाणे रात्री जमेल तेवढा अभ्यास करून आम्ही निघालो रविवारी.
सह्याद्रीत भटकणाऱ्या आमच्या सारख्यांचा स्वर्ग म्हणजे भंडारदरा परिसर. रतनगड, अलंग, मदन, कुलंग, कंत्राबाईची खिंड, घनचक्कर, आजोबा आणि कळसूबाई-महाराष्ट्रातले सर्वोच्च शिखर अश्या कातळकड्यानी आणि गडांच्या अभेद्य भिंतींनी हा स्वर्ग व्यापून ठेवला आहे. यावर कमी म्हणून की काय अफाट भंडारदरा डॅम यात आजून भर घालतो. या अप्रतिम सौंदर्यामध्ये पाबरगड हा रांगडा गडी मांडी थोपटून उभा आहे आणि आज त्यालाच भेट देणार होतो.
भंडारदराच्या पुढे संगमनेरच्या वेशीवर, रंधा धबधब्याच्या डावीकडे हा उंच गड आकाशाला हात लावताना दिसतो. डोंबिवली वरून जवळपास ५ तासाची बाईक राईड होती म्हणून सकाळी ४.३० लाच निघालो आणि घोटी संगमनेर मार्गे 'गुहिरे' हे पायथ्याचं लहानसे गाव गाठलं. पूर्ण वाटेत आम्हाला या 'ऑक्टोबर रेन' (सहसा 'हिट' असते) अखंड वर्षावाने कुडकुडत आणलं होतं; भर पावसात जीवधन करून ही आम्ही कापलो नव्हतो पण या रिमझिम सरींनी आमचा थरथराट केला होता. असो, गावात मारुती मंदिरात काही गावकरी पत्त्यांच्या डावावर उद्याच्या मतदानावर आपले विचार मांडत होते आम्ही आमचा गडावर जाण्याचा विचार मधेच मांडला आणि 'तुम्ही दोघेच?' असा एक प्रश्नार्थक जोकर त्यांनी टाकला पण आम्ही काही 'शो' करायच्या भानगडीत न पडता त्याना वाट विचारली. मंदिरात जमलेल्यानमध्यें काही मतभेद होते ते सर्व ऐकून वाट फारच बिकट आहे अश्या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो आणि त्यापैकी एका वाटेला लागलो, काल रात्री मारलेल्या रट्याच्या जोरावर.
मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या विरगळीच्या समोर बाईक पार्क करून डाव्या बाजूच्या वाटेने आम्ही चालायला सुरुवात केली. वाट मंदिराच्या मागच्या बाजूने जात होती पण भरलेल्या पावसात तो डोंगर आणि वाटेचा अंदाजच येत नव्हता. मंदिराच्या बाजूने पुढे गेल्यावर गावाच्या मागच्या बाजूला वाटेत एका सिमेंटच्या टाकीजवळून वाट डोंगरात शिरायला लागली. या वाटेने पुढे जात एक पाण्याचा ओहोळ पार करून वाट डावीकडून जात होती. वाट मळलेली नव्हती आणि त्यात पावसाने आणि वाऱ्याने झोपवलेल्या गवतात तिला शोधणं म्हणजे एक टास्क होती आमच्यासाठी आणि मग व्हायचं तेच झालं. गावकर्यांनी सांगितल्याप्रमाणे एक पठार लागणार होतं पण जवळ जवळ अर्धा तास चालून पण ते अजूनही लपलेलेच होतं. थोडा विचार करून समोरून येणाऱ्या पाण्याच्या उभ्या प्रवाहाला आम्ही भिडलो, अंदाज हा की तो प्रवाह पाठरावरूनच वाहत असेल. साधारण १५ मिनिट खडी चढाई करून आम्ही एका पठारावर आलो खरं पण वाट नव्हती इथे पण. मग दोघे दोन्ही बाजूला गेलो वाट शोधायला आणि थोड्या वेळाने सचिनने आवाज दिला. त्याला पाठरावर एक पालं मिळालं होतं त्यात एक म्हातारं जोडपं होत. त्यांचा मुलगा गुर घेऊन गेला होता. इथे विचारपूस केली आणि सोंडेवर लावलेल्या एका झेंड्याच लक्ष समोर ठेवून आम्ही त्यांनी दाखवलेली पण न दिसलेली वाट धरली. या झेंड्याच्या शोधात आम्ही अर्धा तास समोर दिसणारी सोंड चढून गेलो आणि पुढे एका टोकावर पायाखालची वाट हरवली. झेंडा पण अजून नजरेस पडत नव्हता मग मारलेला रट्टा आठवला; 'सोंड संपल्यावर डोंगराच्या उजव्या बाजूने वाट जाते', परत थोडं खाली येऊन उजवीकडची वाट शोधली आणि हिने पण आम्हाला दगा दिला. बहरलेल्या कारवीत ही वाट पण हरवली मग पुन्हा विचारविनिमय, दोघे दोन बाजुंना वाट शोधत थोडा वेळ घालवला आणि निसर्गाने साथ दिली अगदी ५ मिनिटांसाठी सगळा पाऊस क्लीयर झाला, इतका की उजवीकडची आम्ही सोडून आलेली सोंड, पाठरावरच त्या आजोबांचं पालं अगदी साफ दिसत होतं. साला, नशीब आमचं आमच्या बरोबर होत या वेळेला. उत्साहाने मागे फिरून पुन्हा त्याच जागी आलो जिथे अगोदर अडकलो होतो. थोडं धाडस करून घुसलो गवतात समोरच्या टेकडीवर आणि थोड्या वेळातच एका टेकडीवर आम्ही ज्याला शोधत होतो तो झेंडा आडवा पडलेला दिसला. असो, आता आम्ही बरोबर वाटेवर होतो... वाट नव्हती पायाखाली पण गवतात अंदाज काढत वाट बनवत होतो. समोर आजून एक डोंगर दिसत होता याला उजव्या बाजूला ठेवून आम्ही घळीत पोहोचलो. या घळीतून उजीवडच्या पाबरगडावर आम्ही चढायला सुरुवात केली. एक लहानसा कातळटप्पा चढून, समोर दिसणाऱ्या मुख्य गडाला बगल देऊन, उजव्या बाजूला गुहेपाशी आलो. कातळात खोदलेली ही गुहा फार मोठी आहे. तोंडाशी दगडाची भिंत बांधून घेतलेली आहे. आतमध्ये खूप शोधल्यावर एक लहानशी पिंड आणि जीर्ण नंदी दिसला. बाहेर समोर भंडारदरा धरणाचं पात्र आणि परिसर मनात साठवून घेऊन आम्ही पुन्हा मागे फिरलो, गडाचा शेवटचा टप्पा चढायला. हा कातळटप्पा तसा कठीण आहे आणि पावसाने तो अजूनच निसरडा केला होता. पुन्हा पावसाने आणि वाऱ्याने धूम ठोकली आणि आम्ही एका अडचणीच्या ठिकाणी कातळाला बिलगून ५-१ मिनिट स्तब्ध उभे राहिलो. एक चुकीची स्टेप किंवा पाय सरकला तर सरळ खाली दरी होती. पुढे त्या गुहेच्या माथ्यावरची फिरून जाणारी निसरडी वाट आणि काही कातळात खोदलेल्या पायर्याराने चढून गडावर पोहोचलो.
गडावर तसं पाहण्यासारखं आता काही उरलेलं नाही. एक लहानसं मंदिर, वाड्याचे काही अवशेष आणि पाण्याची टाकी उरली आहेत. आमचं इथे येण्याचं मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे एक मजबूत ट्रेक आणि आजूबाजूचा सह्यपरिसर! ट्रेक तर उत्तम झालाच होता आमचा. हा ३ तासाचा अंगावरचा ट्रेक विरलेल्या वाटांमुळे जवळजवळ ४ तासात पूर्ण केला आम्ही ते पण रेस्ट किंवा ब्रेक न घेता. पाऊस आणि गडावर उतरलेले ढगांमुळे आम्हाला सह्यपरिसर डोळ्यात भरून घेता आला नाही. खरतरं, ऑक्टोबर ते फेब्रुवारीच्या काळात या रांगेतील सर्व शिखर डोळ्यात भरून घेता येतात पण आमचं बॅड लक, ऑक्टोबरच्या शेवटीही कसदार पाऊस पडत होता. असो, निसर्ग देतो तेवढ घ्यायचं आपण फक्त....पदर पसरून!
परतीची वाट २ तासात कापून आम्ही गुहिरे गाव गाठलं, घरी आलो आणि लागलो दिवाळीच्या तयारीला...
- वैभव आणि सचिन.

Comments
Post a Comment