Posts

Showing posts from 2017

नागेश्वर आणि जोडीला वासोटा..सतरा वर्षांनंतर पुन्हा (Tough Day - Trek to Nageswar to Vasota)

Image
सन २००१, नागेश्वरचा एक कातळटप्पा - विनू - मला *** बनवलं; एक डोंगर सांगून ३ डोंगर चढवले!!! सचिन - अरे आलो आता..आजून ५ मिनिट फक्त! नरेश - हे बोरकूट खा!! दम नाही लागणार!! विकी - अरे चला रे लवकर!! आजून नागशीत लांब आहे.... १७ वर्ष झाली!! पहिला ट्रेक; सचिनने फसवून घडवलेला!! विनू आणि नरेशचा बहुतेक शेवटचाच! २००१ ची मे महिन्याची दुपार, पार दमलेला विनू, गळ्यात बोरकूटची माळ घेऊन उभा नरेश; आमचा सगळ्यांचा गुरू सचिन, मी आणि ३६चा कोड्याक. फोटोज आहेत आजून नरेशकडे....बघून पोट धरून हसण्यासाठी!! नागेश्वर; चोरवणे आणि परिसरातली १५ गावं यांचं जागृत देवस्थान; बाराही महिने इथल्या शिवलिंगाला अभिषेक चालू असतो, गुहेच्या कातळ छतातून, तेही गुफेच्या शेंड्यावर पाण्याचा काहीही  स्रोत नसताना.. निसर्गाचं एक आश्चर्यच!! इथे जाण्याचा आज पुन्हा योग आला वासोट्याच्या ट्रेकच्या निमित्ताने. खरं तर मला वासोटा (व्याघ्रगड) करायचा होता. तो सताऱ्यातून सोपा आहे आणि सगळेच करतात; म्हणून मग 'नागेश्वर ते वासोटा वन डे' करू म्हटलं पण हा ट्रेक माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच जड गेला. पनवेलला धावपळ करून रात...

सफर सेगवा आणि बल्लाळगडची (Trek to Segwa & Ballalgad)

Image
या पिकल्या शेतावर, तुझ्या आभाळाचा जर, या डोंगर वस्तीवर, भोळ्या संभुची पाखर, त्याच्या पंखात पंखात, नंदतोया संसार... आम्ही ठाकर ठाकर, या रानाची पाखरं... 'जैत रे जैत'.... आठवला की आठवते ती 'स्मिता पाटील'!!..काय दिसलीय ती यात...माझी एकचं आणि ऑल टाइम फेवरेट.. पण आज आठवला तो वेगळ्या कारणांसाठी... या ट्रेक ला, गड तर लक्षात राहिलाच पण जास्त लक्षात राहिले ते इथल्या ठाकर पाड्यावर पाहिलेले चेहेरे आणि त्यावर दिसलेले भाव! निरनिराळ्या झाडांची पानं तोडून मासळी बाजार मांडलेली काही मुलं पहिली आणि उगाचच बार्बी किचन सेट आणि आर्मर सेट आठवला. असो; विटा-मातीच्या भिंती आणि फक्त शेणाने सारवलेल्या फर्निशड फ्लॅटमध्ये राहणारी ही सुखी (खरंच) माणसं पाहून आम्ही नेहमीच अचंबित होतो.  आमचा आजचा ट्रेक हा पालघर जिल्ह्यातील 'सेगवा' गड होता. जोडीला बजूचाच 'बल्लाळगड' पण उरकून घेतला.  नेहमीप्रमाणे सकाळी ५ला निघून ८ला आम्ही बल्लाळगडाच्या पायथ्याशी होतो. 'काजळी' हे बल्लाळगडाच्या पायथ्याच गाव. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर १३० किमी वर तलासरी आहे. पुढ...

सफर माहुल - भंडारगडाची (Trek to Mahuli and Bhandargad, Aasangaon)

Image
गणपती गेले गावाला,  चैन पडेना आम्हाला... अशीच अवस्था झाली होती आमची, गणपती गेल्यावर; पण ही बेचैनी ट्रेकची होती. ऑगस्टच्या पहिल्याच आठवडयात घेरा-सुरगड केला तेव्हाच हे किल्ले करायचं ठरलं. गौरी-गणपती विसर्जन आटपून, शनिवार दिवसभर ड्राइविंग करून मी कंटाळलो होतो; म्हणून तो रविवार गेला. पुढच्या रविवारी सचिनला ऑफीसकाम आलं; तो संडे पण गेला. दीड महिना उलटला आणि शेवटी आज मुहूर्त मिळाला. सचिनने माहुली अगोदार केला होता पण त्याचा भंडारगड राहिला होता. माझ्यासाठी दोन्हीही नवीनच होते. मुंबई-नाशिक हायवेवरुन, आसनगावजवळ डाव्या बाजूने सह्याद्रीच देखणं रूप दिसतं. तीन गड, पाच सुळके नजर रोखून ठेवतात बघणाऱ्याची....माहुली, भंडारगड, पळसगड आणि नवरा, नवरी, भटोबा, वजीर आणि अगदी डाव्या बाजूला एक लिंगी....माहुलीचा हा सुंदर परिवार जवळून बघायला मी खूप दिवसांपासून आतुर होतो. नेहमीप्रमाणे सकाळी ५.३०ला बाइक निघाली डोंबिवलीवरून, नाशिक हायवे पकडून माहुली गावात पोहोचलो आणि ट्रेक सुरू केला तेव्हा ७ वाजले होते. माहुली - सकाळी ७ ला ट्रेक चालू केला. वनविभागाचे ऑफिस हवर्स सुरु न झाल्याने, गेट वरून उड...

सफर सुरगड आणि मानगडची (Trek to Surgad and Mangad)

Image
पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटी कुंडलें बरीं । सुवर्ण कटि कांसोटी घंटा किंकिणि नागरा ॥ असे हनुमानाचे ध्यान समर्थांना दिसते. समर्थांच्या मते, हनुमान हा समाजाचा संरक्षण मंत्री, म्हणूनच आपण त्याला गावाच्या वेशीवर बसवलेला; खूप पूर्वीपासूनच. मारुतीची विरमुद्रा मूर्ती जवळ जवळ प्रत्येक गडावर दिसते. या मूर्तींच्या शेपटीचे टोक गडाचा माथा दर्शवतात अगदी 'पुच्छ ते मुरडिले माथा' या ओळीला अनुसरून. गड-किल्ले पाहणाऱ्यांसाठी ही खूणचं. आजपर्यंत पाहिलेल्या मारुतींपैकी सर्वात मोठी मूर्ती मी 'सुरगडावर' पाहिली. चेहऱ्यावर राकट भाव, मिशी, कमरेला खंजीर असलेली आणि पायाखाली पनवती राक्षसीणीला चिरडलेली मूर्ती  खरच 'भीमरूपी महारुद्र' होती. गेल्या वर्षी आम्ही कुंडलिका नदीचा उगम म्हणजे 'भीरा' गाव (देवकुंड) आणि ती अरबी समुद्राला मिळते तो किल्ला म्हणजे कोर्लई हे दोन्ही पाहिले. कुंडलिका ही कोकणातली एक प्रमुख नदी. प्राचीन काळा पासून या नदीतून व्यापार चालत असे. घाटावर जाणारा माल विविध (ताम्हणी, थळ घाट इत्यादी) घाटमार्गंनी घाटमाथ्यावरील बाजारपेठेत जात असे. याच व्यापारी मार्गांचे रक्षण...