Posts

Showing posts from 2018

परशुरामाची तपोभूमी...साल्हेर (Trek to Salher)

Image
काय करूया? साल्हेर-सालोटा आता होणार नाहीत! दोन तास बिहाइंड शेडुल आहोत आपण! मांगी-तुंगी करूया की मुल्हेर! समोर मांगी-तुंगी दिसत होता. रस्त्यावरचा बोर्ड साल्हेर ३० किमी दाखवत होता आणि याच मार्गावर मुल्हेर १३ किमी वर होता. बाईक कडेला लावून, या चौकात १० मिनिटं चर्चा केली आम्ही आणि शेवटी सलोट्यावर पाणि सोडून साल्हेर-महाराष्ट्रातील सर्वांत उंच किल्ला करायचं ठरवलं. आमचं प्लॅनिंग सालोटा-साल्हेरचं होतं म्हणूनच रात्री ११.३० वाजता डोंबिवली सोडली आणि सकाळी ६.३० ला ट्रेक सुरू करणार होतो. रात्री ३.३०ला, नाशिकच्या मुबई चौकात आपल्या ३चाकी घेऊन उभ्या असलेल्या मित्रांना रूट कन्फर्म करण्यासाठी थांबलो आणि आपुलकीची अधिक सक्तीची रेस्ट पदरात पाडून घेतली. पुढल्या वाटेवर, बाईकवर फक्त दोघंच जाणं 'खतरेसे खाली नही'; रस्ता सामसूम आहे आणि चोरांची/लुटारूंची भिती आहे. १० वर्षापूर्वीचे आम्ही (सोंडके) असतो तर दुर्लक्ष्य केलं असतं पण आता बाजूच्या एसटी स्थानकात अंथरूण टाकलं. सकाळी ५.३०ला बाईक परत सुरू केली पण या दोन तासांच्या झोपेत सालोटा आमच्या स्वप्नांत विरला. साल्हेर; परशुरामाची तपोभूमी! भगवान विष...

आजून एक भैरव! शिरपुंज्याचा...(Trek to Bhairavgad, Shirpunje)

Image
पुढंचं कोन हाय??? मी!....मनातली सुप्त इच्छा तशीच ठेवून मी गप्प उभा होतो. भैरोबचा पुजारी, डोक्यावर कडुलिंबाच्या पाला ठेवून कौल लावत होता. देवाच्या डोक्यावर पाला तसाच राहिला तर इच्छा पूर्ण होणार आणि तो पडला तर अपूर्ण. माझ्याही काही इच्छा होत्या पण....राहूदेत... आज आम्ही होतो शिरपुंज्याच्या भैरवाच्या गुहेत. अखंड दगडात कोरलेला अश्वारूढ भैरोबा; समोर उभा पुजारी, खाली आशेने बसलेला गोतावळा आणि एक निरव शांतता. आज रविवार, भैरोबाचा वार म्हणून थोडे भाविक जमले होते. शिरपुंज्याचा भैरोबा म्हणजे पंचक्रोशीतल्या लोकांचे जागृत दैवत पण आम्ही मात्र गड पाहायला आलो होतो; भैरवगड. महाराष्ट्रातील ६ भैरवगडांपैकी एक; हरिश्चंद्रगडाच्या अंगणातील दुसरा आणि आम्ही पाहिलेला तिसरा...शिरपुंज्याचा भैरवगड. हरिश्चंद्रगडावर राजूर मार्गे येणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी हा गड उभारला होता. शिरपुंजे गावातील या गडावर भैरोबाचे मंदिर आहे, दर वर्षी आश्विन महिन्यात इथे जत्रा भरते आणि तीच आमंत्रणही आम्हाला मिळालं... पाव्हन! ४ तारखेला देवाची जत्रा आहे..३ तारकेला रात्रीचं या! डोंबिवलीवरून ४.३० निघून, इगतपुरीमार्...

सफर रामशेज आणि देहेरगडाची (Trek to Ramsej and Dehergad fort)

Image
गड किल्ले राखावे, पराक्रमाचा तमाशा दाखवावा; राजश्री आबासाहेबांचे संकल्पित तेच आम्हास करणे अगत्य | कुठेतरी वाचलेलं, छत्रपती संभाजी राज्यांच्या एका पत्रातील हे वाक्य!  शंभू राजे छत्रपती झाल्यावर त्यांच्या जीवनाचा आणि असाधारण मुत्युचाही आढावा घेतला असता, पदोपदी आपल्याला या वाक्याची प्रचिती येते.  याचं शंभू राजांचा मुसद्दीपणा आणि आम्हा चिवट मराठयांचा इतिहास ठासून सांगणारा 'रामशेज', आमचा आजचा पहिला किल्ला.  औरंगजेबाला सुमारे साडेपाच वर्ष झुंजवणारा आणि या लढ्यात हात हलवत माघार घ्यायला लावणारा...रामशेज. हा किल्ला जरी लहान असला तरी त्याचा इतिहास खूपच मोठा आहे. शहाजहान हा जेव्हा शहाजीराज्यांच्या विरोधात दक्षिणेत उतरला तेव्हा त्याने त्याच्या दख्खन मोहिमेचा मुहूर्त 'रामशेज' हा निजामशाहीचा किल्ला घेऊन केला. आपल्या वडिलांचा तक्ता गिरवत औरंगजेब, महाराज्यांच्या मृत्यूनंतर, स्वराज बुडवायला आपली साडेपाच लाखांचं सैन्य घेऊन उत्तरेतुन निघाला. दख्खन मोहिमेची सुरवात रामशेज घेऊन करायचा त्याचा मानस होता. मुघलांच्या ताब्यातील  गुलशनाबाद (नाशिक) पासून १० मैलावर असलेला 'रामशेज...