परशुरामाची तपोभूमी...साल्हेर (Trek to Salher)
काय करूया?
साल्हेर-सालोटा आता होणार नाहीत! दोन तास बिहाइंड शेडुल आहोत आपण! मांगी-तुंगी करूया की मुल्हेर!
समोर मांगी-तुंगी दिसत होता. रस्त्यावरचा बोर्ड साल्हेर ३० किमी दाखवत होता आणि याच मार्गावर मुल्हेर १३ किमी वर होता.
बाईक कडेला लावून, या चौकात १० मिनिटं चर्चा केली आम्ही आणि शेवटी सलोट्यावर पाणि सोडून साल्हेर-महाराष्ट्रातील सर्वांत उंच किल्ला करायचं ठरवलं.
आमचं प्लॅनिंग सालोटा-साल्हेरचं होतं म्हणूनच रात्री ११.३० वाजता डोंबिवली सोडली आणि सकाळी ६.३० ला ट्रेक सुरू करणार होतो. रात्री ३.३०ला, नाशिकच्या मुबई चौकात आपल्या ३चाकी घेऊन उभ्या असलेल्या मित्रांना रूट कन्फर्म करण्यासाठी थांबलो आणि आपुलकीची अधिक सक्तीची रेस्ट पदरात पाडून घेतली. पुढल्या वाटेवर, बाईकवर फक्त दोघंच जाणं 'खतरेसे खाली नही'; रस्ता सामसूम आहे आणि चोरांची/लुटारूंची भिती आहे. १० वर्षापूर्वीचे आम्ही (सोंडके) असतो तर दुर्लक्ष्य केलं असतं पण आता बाजूच्या एसटी स्थानकात अंथरूण टाकलं. सकाळी ५.३०ला बाईक परत सुरू केली पण या दोन तासांच्या झोपेत सालोटा आमच्या स्वप्नांत विरला.
साल्हेर; परशुरामाची तपोभूमी! भगवान विष्णूंच्या सहाव्या अवताराने, जिंकलेल्या पृथ्वीचं दान केल्यानंतर आपल्यासाठी भूमी निर्माण करण्यासाठी समुद्राला मागे ढकलण्यासाठी येथूनच बाण सोडला आणि कोकण प्रांत निर्माण केला, अशी आख्यायिका आहे. किल्ल्याच्या माथ्यावर याचं परशुरामाचं मंदिर सुद्धा आहे.
आपल्या मराठ्यांच्या इतिहासातील एक सोनेरी पान देखील इथेच लिहलं गेलं. गनिमी कावा म्हणजे मराठ्यांची ओळख पण उघड्या मैदानातील पाहिलं युद्ध मराठ्यांनी इथे खेळलं आणि जिंकलंही. तुंबळ लढाई झाली. मराठ्यांनी दहा हजार मावळे गमावले, मात्र त्यांनी मोगलांची अर्ध्यापैक्षा जास्त फौज कापून काढली; मोगलांना सळो की पळो करून सोडलं. सहा हजारांपेक्षा जास्त घोडे-उंट, सव्वाशे हत्ती आणि मोठा खजिना मराठ्यांच्या हाती लागला. या किल्ल्याचं महत्त्व बहामनी राजवट आणि त्या पूर्वीपासून अबाधित राहिलं आहे. त्याचं स्थान गुजरात आणि बागलाण या प्रांतांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गावर असल्यानं शिवाजी महाराजांनीसुद्धा त्याचं महत्त्व ओळखलं नसतं तरच नवल! त्यामुळेच महाराजांनी १६७० मध्ये सुरतेच्या लुटीच्या वेळी परतताना साल्हेरचा किल्ला या लढाईत जिंकून घेतला व काही दिवस इथे मुक्कामही केला.
असो, आम्ही असेच इतिहासात रमतो; परत वर्तमानात येऊ!
सकाळी ८.३० ला आम्ही वाघंबे गाव गाठले. समोर दोन्ही डोंगर स्पस्ट दिसत होते, डावीकडचा सालोटा आणि उजवीकडे साल्हेर. घाईघाईत वाट विचारली आणि लागलो चालायला. थोडं पुढे आल्यावर लक्षात आलं की गाडीची चावी सापडत नाही आहे, मग शोधाशोध झाली आणि जाऊदे नंतर बघू म्हणून आम्ही पुन्हा मार्गाला लागलो. एक मोठा वळसा मारून आम्ही एका सोंडेल लागलो, ही सोंड जरा जास्तच लांब होती आणि दोन्ही किल्ल्यांच्या घळीत ती थांबली. डोंगराच्या डावीकडून एक वाट गडावर घेऊन जात होती ती आम्ही धरली. पुढे थोड्याच अंतरावर, ५-६ ट्रेकर्स ची गडबड चालू होती. त्यातले दोघे जण वाट शोधण्याच्या गडबडीत एक रॉक पॅच चढून गेले आणि अडकले, ना वर जाता येत होतं ना खाली. त्यांच्या मित्रांनी मदत मागितली, आम्ही अंदाज घेत होतो तोवर एकाने कातळाला पाठ करून चुकीची मूव्ह केली; एकचं गलका उडाला...डॉक्टर...पेशाने डॉक्टर असलेल्या त्यालाच आता स्टेचरवर न्याव लागत की काय म्हणून आमच्याही मनात धस्स झालं. त्या कातळावर दोन टप्पे खाऊन सुद्धा डॉक्टर आउट झाले नाहीत...नशीब! एका ठिकाणी अलगद अडकले, तिथूनही त्यांना खाली येता येत नव्हतं, मग मी आणि सचिन फस्ट एड बॉक्स घेऊन गेलो आणि धरून सुरक्षित ठिकाणी आणून बसवला. या सगळ्या गडबडीत त्यांचे 'ट्रेकर्स' मित्र नुसता आरडाओरडा करत होते आणि तोही एकही स्टेप पुढे न जाता. डॉक्टर पण भारीच, मानातून घाबरलेले असले तरी तोंडाने, गिरे तो भी टांग उपर. तोपर्यंत, जवळच बकऱ्या चरवणारा एक गावकरी पुढे आला आणि डॉक्टरांच्या दुसऱ्या हायकर ला धरून सुरक्षित ठिकाणी घेऊन गेला.
या सगळ्या आपटाआपटीत अर्धा तास वाया घालवून आम्ही पुन्हा वाटेला लागलो. हीच वाट पुढे फिरून मारून गडाच्या पहिल्या दरवाज्यात घेऊन गेली. या पहिल्या पडक्या दरवाजातून आत शिरताच समोर सलोट्याच काय अप्रतिम चित्र दिसत होतं. इथेच गडाच्या, दगडात कोरलेल्या पहिल्या वळणदार पायऱ्या लागल्या. पायऱ्याना दुसरा लहानसा सुंदर नक्षीकाम असलेला दरवाजा लागला. या दरवाज्या मागे पुन्हा कातळात खोदलेल्या पायऱ्या तिसऱ्या दरवाज्याजवळ घेऊन गेल्या. या दरवाज्यापासून डोंगरात कपारी खोदून हमरस्ता बनवला आहे. डाव्या बाजूला कातळात खोदलेल्या गुहा आणि उजवीकडे खोल दरी. हा रस्ता पार करून, सलोट्याच्या विरुद्ध दिशेला चौथा दरवाजा लागला जो किल्ल्याच्या पठारावर घेऊन गेला. विस्तीर्ण पठार, उजवीकडे गंगासागर तलाव आणि रेणुका मातेच मंदिर, समोर गडमाथ्यावर, परशुरामाचं मंदिर दिसत होतं. खरी वाट उजवीकडून रेणुका मातेच्या मंदिरापासून वळसा घेऊन जाते पण आम्ही उभं चढायचं ठरवलं, वेळ वाचवण्यासाठी. १५-२० मिनिटात मंदिराजवळ आलो आणि आजूबाजूचे ठेंगणे डोंगर नजरेत भरत काही वेळ घालवला. समोरचा अवाढव्य सालोटा देखील लहान भावासारखा वाटत होता. गुजरात-बागलाण प्रांतातले जवळपास सगळेच डोंगर इथून दिसत होते. समोर दक्षिणेला अजंठा - सातमाळा डोंगरातले धोडप, इखारीया हे सुळके दिसत होते. पूर्वेकडे मांगीतुंगी, तांबोळया, न्हावीगड, हनुमान टेकडी, मुल्हेरगड, हरगड, मोरागड आणि सालोटा नजरेस पडले. समोरच हरणबारीचे धरण पण सुंदर दिसत होतं.
हा सगळा सह्यपरिसर नजरेत आणि मनात साठवून आम्ही गाद उतरायला सुरुवात केली. उतरताना आम्ही पठारावर जाणारा मार्ग निवडला. इथे काही गुफा, रेणुका मातेचं मंदिर आणि गंगासागर तलाव पाहून आम्ही गड उतरून गेलो. उतरताना, चौथ्या दरवाज्याजवळ डॉक्टर पुन्हा भेटले आम्हाला. सोबत फोटो काढून घेतला आमचा आणि पुन्हा भेटू कधीतरी अस बोलून आम्ही निघालो.
साल्हेर; ३ वाटा जातात गडावर आणि तिन्हींही वाटेने ३ तसाच लागतात. आम्ही घेतली ती वाघंबे गावाची वाट. या वाटेने गड गाठायला ३ तास लागतात. दुसरी वाट साल्हेर वाडीतून जाते, हिनेही जवळजवळ ३ तसंच लागतात. तिसरी वाट माळदार मार्गे, आमच्या माहिती प्रमाणे हिनेही ३ तसाच लागतात पण एक गावकरी भेटला (भाऊदास पवार 9421828273, 9168573846 - क्वाल करा) तो म्हणाला एका तासात खिंडीत जाते ही वाट.
नाशिक म्हणजे धर्मपीठ; त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी, वणी, पंचवटी, रामाची देवळे असे अधिष्ठान लाभलेल्या भाविकजनांचे श्रद्धास्थान. पण हेच नाशिक आमच्यासारख्या भाटक्यांसाठी पांढरी. महाराष्ट्रातील साडेतीनशे किल्ल्यांपैकी सुमारे ३० किल्ले नाशिक जिल्हय़ात आहेत. येथील किल्लेही उंच, दमछाक करणारे, गिर्यारोहकांचा कस पाहणारे, नवशिक्यांची छाती दडपणारे. असाच एक दमछाक करणारा साल्हेर आम्ही आज पहिला!
- वैभव आणि सचिन.

Comments
Post a Comment