Trek to Khanderi and Underi fort - सफर खान्देरी आणि उंदेरीची
अगोदर ते घाणेरडे मातीचे कपडे वेगळे ठेव! आदिवासी कुठचा!...घरी आल्या आल्या मिळणारा धमकीवजा आदेश नेहमीच कानावर पडतो. पण सध्या, आमच्या अंगा-खांद्यावरून घरात येणाऱ्या मातीची जागा समुद्राच्या वाळूने घेतलीय आणि आज ती 'उंदेरी-खान्देरी' या जोडगळीची होती. या किल्ल्याना भेट द्यायची म्हणजे स्पेशल बोट करावी लागते आणि नावाड्याला आपला दिवस मोडून यावं लागत असल्याने पैसेही तसेच लागतात. यात काही वावग नाही; साधासुधा व्यवहार. या आमच्या सफरीतला हा पोर्शन पार पडायला मदत केली ती सचिनच्या (आणि आता माझ्याही) एका मित्राने...अमित शिंदे, दुर्गवीर....या सह्याद्रीत रमणाऱ्या अनेक दुर्गविरांसारखाच पण आपल्या संस्थेचं नाव लावणारा...'दुर्गवीर प्रतिष्ठान'. हा रविवार, सचिन आणि माझ्यासाठीही तसा मोकळाच होता म्हणून 'पद्मदुर्ग' साठी प्लॅन करत होतो पण तो शनिवारी फसला. दिवस सार्थकी लावावा म्हणून रात्री ९.३०ला फन अँड फिट जिमच्या ट्रेडमिलवर 'खान्देरी-उंदेरी' चा 'प्लॅन बी' आखला. अमितची हि मोहीम ठरलेली होती. आम्ही त्याला जॉईन करण्यासाठी विचारल आणि ठरल. आमच्या सवडीप्रमाणे म्हणा किंव...