Posts

Showing posts from 2022

रवळ्या-जवळ्या जोडकिल्ले (Trek to Ravlya Javlya)

Image
१० किमीचा वॉर्मअप; ट्रेकच्या आधी; म्हणजे कहरच ! वणी वरून दर अर्ध्या तासाने कळवण साठी बसेस आहेत! सहाच्या दरम्यान ट्रेक सुरू करू आणि दोन्ही एका दिवसात उडवू; संध्याकाळी सहा पर्यंत घरी परत!! असा मास्टरप्लॅन होता पण... ठाण्यालाच, सुमारे दीड तास लेट झाली आमची नाशिक एसटी. वणीला पोहचायलाच ६ वाजले आणि कहर म्हणजे बाबापूर-मुळाणे मार्गे कळवण एसटी करोना काळात बंद झाली ती आजून चालू झालीचं नव्हती. एसटीस्टँड बाहेर चहावाल्याने सांगितलं म्हणून मग १ किमीवर वणी बाजारपेठेत जाऊन काही मिळतं का पाहिलं आणि इथे आजून एक सरप्राईज; रस्त्याचं काम चालु होतं आणि लोकल गाड्याही बंद. च्यायला; सगळा प्लॅन बोंबलला ! आता दोन काय एकतरी होईल का याची चर्चा आम्ही करत ११ नंबरच्या बसने (पायी) चालू लागलो. जास्त नाही फक्त १० किमी अंतर आहे बाबापूर खिंडीपर्यंत पण आता ऑप्शन नव्हतं; करो या मरो या धर्तीवर चालता-चालता आम्ही वेळेची गणितं मांडत होतो. मागे जाऊन पुन्हा घरी परतावं; अस पण आलं आमच्या मनात पण तो विचार मागे टाकून चालत राहिलो. दोघांपैकी एक उरकून पठारावर किती वाजता येतो यांवर दुसऱ्याचं काय करायचं ते ठरवू ! गाड्या खूपच कमी आहेत या र...

किल्ले कुंजरगड सफर (Trek to Kunjargad)

Image
आपल्या आयुष्यात काही गोष्टी आपण कमवतो तर काही आपल्याला फक्त नशिबाने मिळतातं आणि त्यात आपलं काहीच कर्तृत्व नसतं. आशा गोष्टींचा दुर्दम्य अभिमान बाळगावा असं मला स्वतःला तरी वाटत नाही. आपला जन्म हा यांपैकीच एक; पण तरीही तो महाराष्ट्रात झाला आणि तोही मराठी म्हणून, हे एकचं मी माझे अहोभाग्य समजतो. स्वराज्य कसे मिळवावे, त्याचं सुराज्य कसे करावे याचा प्रत्यय देणारा एकमेव राजा छत्रपती इथे, या मातीतचं झाला आणि आपण त्यांचेच अनुयायी आहोत.  इथला सह्याद्री आणि त्यावरचे गडकिल्ले हे फक्त दगड-मातीच्या इमारतींचे अवशेष नसून, ते राज्यांच्या पदस्पर्शाने आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्याने, त्यागाने पवित्र झालेले यज्ञकुंडच आहेत. म्हणूनच हे गड किल्ले म्हणजे पर्यटनक्षेत्र नसून रणक्षेत्र आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेऊन या किल्ल्याचे जतन आणि संगोपन आपण केले पाहिजे. कुंजरगड! लोहगडासारखा विंचूकाटा आहे या गडाला; पण या काट्यावर लोखंडी रेलिंगची तोरण लावून त्याची पार लया घालवलीय आता! तटबंदी बर्यापैकी शिल्लक आहे, यावर, दोन-तीन दगड लावून डागडुजी करून गडाचं गडपण राखून ठेवता आलं असतं पण...असो.. १६७० मध्ये राजे दिंडोर...