अवचितगड आणि बिरवाडी...कोंकण किल्ले....(Trek to Avchitgad and Birvadi fort)

****, साप गेला पायावरून!!.. एका सेकंदात पास झाला!!.... भीती वाटायला पण वेळ नाही मिळाला... (सचिन आणि मी - फोनवर) अवचितगडाची वाट शोधताना, आतापर्यंतच्या ट्रेक मध्ये पहिल्यांदाच एखाद जनावर अंगावरून गेलं माझ्या. अस्सल, ४-१ फूट असेल..करड्या रंगाचं.. अवचितगड चढायला सुरवात केली आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये किल्ल्याच्या कातळाकडे तोंड देणारी, डावीकडची वाट धरली. खरी वाट गडाच्या सोंडीवरून उजवीकडून जात होती. या फसव्या वाटेने थोड्याच वेळात आमची साथ सोडली पण आम्ही हुशार!...घुसलो झाडीत आणि अर्ध्या तासात उभी चढाई करून कातळाच्या छातीला आलो. आता पुढे कुठेच अप्रोच दिसत नव्हता. किल्ल्याचा माथा डोक्यावर दिसत होता आणि खाली परत उतरून वाट शोधायला वेळ नव्हता आमच्याकडे, ३ किल्ल्याचं टार्गेट होत आमचं आज. म्हणूनच रोप जवळ नसतानाही, तो ५० फुटी कातळ उभा चढायचं ठरवलं. सचिन...उंची ५ फूट, वजन साधारण ५५ किलो...काटक...सारड्या सारखा चढला. मी; ५.९ फूट, ८१ किलो....जड...१०-१५ फूट चढलो आणि मग ग्रीप मिळत नव्हती रॉकवर. उतरलो खाली आणि डावीकडुन, त्याच कातळात दुसरा सोपा रूट शोधायला वाट काढत राहिलो. ५-१ मिनिटं, त्या कातळाला प्रद...