Trek to Trambakgad aan Durgbhandar - कोरलेल्या कातळाच्या पोटात....
सहजच फेसबुकवर फेरफटका मारताना एक पोस्ट वाचनात आली. 'दुर्ग भांडार' नावाच्या; त्र्यंबकगडाच्या जवळच्या; बऱ्याच जणांना माहिती नसेल अश्या एका गडाबाबत होती ती. मी पण याच 'बऱ्याच जणांमध्ये' होतो. मग काय!... अरे सचिन, रविवारी काय करतोयस??....नेहमीचा फोन नंबर आणि सध्या नेहमीचाच झालेला प्रश्न....आणि उत्तर हि नेहमीचच. ती लहानशी पोस्ट वाचून वाढलेली उत्कंठा घेऊन आम्ही त्र्यंबकगडाच्या पायथ्याशी सकाळी ८.३० वाजता पोहोचलो. डोंबिवलीतून निघताना चेक केलेला नाशिकचा ६ डिग्री पारा इथे पोहचता-पोहचता -६ डिग्री झाल्यासारखा वाटत होता. हातातील बाइक आणि नाकातुन वाहणार पाणी, दोघांनाही मोठ्या शिताफीने कंट्रोल करत आम्ही पूर्ण प्रवास अक्षरशः संपवला. सकाळी ५ च्या सुमारास निघून २ तासात आम्ही पहिला ब्रेक घेतला तो 'घाटणदेवीला'. आजपर्यंत या रेंज मध्ये केलेल्या सर्व ट्रेकमध्ये अंगवळणी पडलेली एक सवय म्हणजे, 'कसारा घाटातील घाटणदेवीला नचुकता केलेला नमस्कार'. पुढचा प्रवास १.३० तासात संपवून आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिरापाशी पोहचलो आणि त्या तिर्थक्षेत्री स्व:आत्मास वडाउसळीचा नैवेद्य दाखवून त्र्यं...