Posts

Showing posts from 2024

न्हावीगड...बागलाणचा रतनगड (Trek to Hnavigad))

Image
साला, वेळ कधी बदलली कळलंच नाही ! एक वेळ अशी होती की आम्ही कुठल्याही वेळी ट्रेकसाठी तयार असायचो; एका फोनवर बॅग उचलून निघायचो. नंतर, गेले काही वर्षे; वेळ काढावा लागायचा आणि आता अशी हालत आहे की वेळ काढायला वेळ मिळत नाही. हा, 'बागलाणचा रतनगड'; म्हणजेच ' न्हावीगड'  गेले ४ वर्ष आम्ही डिस्कस करत होतो पण वेळ आली नव्हती; कारण ट्रावलिंगसाठी लागणारा एकूण वेळ! जवळपास २७० किमी वर आहे डोंबिवलीहून. आता आजून किती वेळ मारून न्यायाची अशीचं, म्हणून मग गेल्या शनिवारी रात्री ११ची वेळ ठरली. नाशिक जिल्ह्यातील बागलाण प्रांत म्हणजे आमच्यासारख्या फिरस्तांसाठी चैनचं ! सह्याद्रीच्या उत्तर-दक्षिण जाणाऱ्या डोंगररांगेला सेलबारी आणि डोलबारी रांग म्हणतात. सेलबारी डोंगररांगेत मांगीतुंगी, तांबोळ्या, ह्नावीगड तर डोलबारी रांगेत साल्हेर, सालोटा मुल्हेर, मोरा, हरगड असे किल्ले आहेत. एकापेक्षा एक उर भरून दम काढणारे गड ! गुजरात बॉर्डरवर असल्याने यांना गाठण्यासाठी खुपचं वेळ काढावा लागतो आमच्या सारख्यांना ! न्हावीगड,  शिवकालीन कागदपत्रानुसार नाहवागड किंवा रतनगड, बागलाणचा! ४१०० फूट उंच आणि नाशकातल्या बाकी किल्ल्या...