स्वराज्यतोरण..पुन्हा एकदा अंधुक (Trek to Torna Fort)

४ - ४.३० वाजले होते; बुधला माचीच्या मागे, सोंडेवरच डॉक्टरचा पाय मुरगळला. आधीच डॉक्टर डाऊन झाली होती आणि त्यात पाय मुरगळला; नाहीच जमणार म्हणत होती. मंदिरात तिचं मोरल बुस्टिंग सेशन झालं, आमच्यातल्या काही डॉक्टरांकडून; अंधार पण पडायला लागला होता. ठरलं, काहींना घेऊन सचिन पुढे गेला, गाडी मिळाली तर अरेंज करायला, कारण कमिटमेंट होती; घेवून आलेल्या ग्रुपसाठी, रात्री मुंबईत पोहचवायाची. आम्ही काही मोजकेच म्हणायला जरा धष्टपुष्ठ गडी डॉक्टर बरोबर तिच्या स्पीडने चालत राहिलो अंधारात लहान टॉर्चच्या उजेडात. नीटसं आठवत नाही आता, पण एका काठीवर, सिटिंग स्ट्रेचरवर डॉक्टरना बसवून, आम्ही दोघे-दोघे खांदे बदलत वेल्हे गाठलं. राहिला किल्ला पहायचा ! २०१०, दोन दिवसांचा ट्रेक, राजगड-तोरणा. रात्री राजगडावर, ऋषीच्या हातचा मस्त खिचडीभात, नंतर आमचं सगळ्यांचं बे-सुगम संगीत झालं. सकाळी संजीवनी माची आणि गडाची सोंड पकडून तोरणा करून, वेल्हातुन ७-७.३० ची एसटी पकडून ट्रेक संपवायचा होता, पण नाही झालं ठरल्याप्रमाणे. २०१२, तोरणा ते रायगड, ट्रेक ठरला. अंधार पडायच्या आत लिंगणाच्या माचीवर पोहचायच होतं आणि बोराट्याची ...