रवळ्या-जवळ्या जोडकिल्ले (Trek to Ravlya Javlya)

१० किमीचा वॉर्मअप; ट्रेकच्या आधी; म्हणजे कहरच ! वणी वरून दर अर्ध्या तासाने कळवण साठी बसेस आहेत! सहाच्या दरम्यान ट्रेक सुरू करू आणि दोन्ही एका दिवसात उडवू; संध्याकाळी सहा पर्यंत घरी परत!! असा मास्टरप्लॅन होता पण... ठाण्यालाच, सुमारे दीड तास लेट झाली आमची नाशिक एसटी. वणीला पोहचायलाच ६ वाजले आणि कहर म्हणजे बाबापूर-मुळाणे मार्गे कळवण एसटी करोना काळात बंद झाली ती आजून चालू झालीचं नव्हती. एसटीस्टँड बाहेर चहावाल्याने सांगितलं म्हणून मग १ किमीवर वणी बाजारपेठेत जाऊन काही मिळतं का पाहिलं आणि इथे आजून एक सरप्राईज; रस्त्याचं काम चालु होतं आणि लोकल गाड्याही बंद. च्यायला; सगळा प्लॅन बोंबलला ! आता दोन काय एकतरी होईल का याची चर्चा आम्ही करत ११ नंबरच्या बसने (पायी) चालू लागलो. जास्त नाही फक्त १० किमी अंतर आहे बाबापूर खिंडीपर्यंत पण आता ऑप्शन नव्हतं; करो या मरो या धर्तीवर चालता-चालता आम्ही वेळेची गणितं मांडत होतो. मागे जाऊन पुन्हा घरी परतावं; अस पण आलं आमच्या मनात पण तो विचार मागे टाकून चालत राहिलो. दोघांपैकी एक उरकून पठारावर किती वाजता येतो यांवर दुसऱ्याचं काय करायचं ते ठरवू ! गाड्या खूपच कमी आहेत या र...