सप्तेश्वर आणि सोमेश्वर... आपलं कोकण (Sapteshwar and Someshwar, places to visit near Sangmeshwar)

- हे कधी बांधलेले आहे? - काय म्हायती रे बावा, मी पन या गावात सासरवासीन आलेली हाय मंदिरात कुठलातरी औषधी पाला शोदायला आलेल्या पंचाहत्तरीच्या जवळपासच्या आजीने दिलेलं हे उत्तर. आम्ही दोघेही इथले 'माहेरवासीन' असूनसुद्धा आम्हाला कुठे माहीत होतं. माझं मूळ गाव तर इथून फक्त वीस-एक किलोमीटरवर आहे, कॉलेजपर्यंत सगळी उन्हाळ्याची सुट्टी याच गावात घालवली आहे मी, तालुका पण तोच, या रस्तावरून जवळपास हजार एकवेळा येजा केली असेल; तरीही नावसुद्धा ऐकलं नव्हत या सुंदर ठिकाणांचं...सप्तेश्वर आणि सोमेश्वर! मुंबईचा चाकरमानी गणपतीसाठी कोकणात कसातरी पोहोचतोच. मुंबई-गोवा हायवेची चांद्रमोहिम, चतुर्थीच्या आदल्या दिवशीच्या टेरिफिक ट्राफिक प्रवासाचा अनुभव आणि न मिळणाऱ्या सुट्टीच्या कारणास्तव, शनिवारी प्रवास केला. रविवार जरा सार्थकी लावावा म्हणून जवळची ठिकाण शोधत होतो तेव्हा या दोन ठिकाणांची महिती मिळाली. तीन-एक किमी ऑफरोड असल्यामुळे बाईक घेऊन येण्यासाठी भूषण यांना आग्रह केला आणि निघालो. शास्त्री पूल पार करून संगमेश्वरकडे जाताना, मुळये हॉस्पिटलच्या विरुध्द दिशेला एक कच्चा रस्ता जाताना दिसतो. हाच उभ्या चढणीचा, कच...