सोनगड आणि पर्वतगड..अविनाश असं चैतन्य (Trek to Songad and Parvatgad)

पाऊस जरा रुजायला लागला की आपल्याकडे आळंबीसारखे अगणित ट्रेकर्स प्रत्येक शनिवार-रविवारी उगवतात. मुंबई-पुण्याच्या आसपास असलेल्या गड-किल्ल्यावर तर जत्रा भरते आणि मग काही ऐकू नये अश्या गोष्टी कानावर येतात. आम्ही या जत्रांमध्ये न बावरता, पावसाचा अंदाज घेऊन लहानमोठे आणि एकाकी ठिकाणं शोधतो. यावेळी आम्ही सिन्नरची सोनगड आणि पर्वतगड ही जोडगोळी निवडली. गड लहान असल्याने मुलांनाही घेऊन जायचं ठरवलं आणि म्हणून मग गेल्या आठवड्यात पावसाने घातलेलं रेड-ऑरेंजच थैमान लक्षात घेवून चारचाकी घेऊन जाण्याचा बेत केला. एक जुना मित्र, अविनाश पण जॉईन झाला आम्हाला या वेळी. माझ्या मुलीने माघार घेतली, कारण आलेला वायरल आणि आईचा ताप! सकाचिनचा चैतन्य होता बरोबर. असे आम्ही चारजण, चारचाकीवर पहिल्यांदाच, दोन लहान किल्ले करायला निघालो. खरंतर गेल्या रविवारचा प्लॅन होता पण या दिवशी मी सहकुटुंब गटारीला प्राधान्य दिलं कारण आजच्या/पुढच्या रविवारी एकादशी होती! सचिनच्या शिव्या खाल्ल्या पण... असतात काही गोष्टी ट्रेकपेक्षा चविष्ट!! शनिवारी रात्री ११.३० च्या दरम्यान गाडी गेटच्या बाहेर निघाली आणि नाशिकमार्गे सिन्नरच्या पुढे एका ...