केंजळगड/मोहनगड, १० वर्षांपूर्वी राहून गेलेला (Trek to Kenjalgadh)

डंपर थांबला अचानक एका घरासमोर. - मामी... ए मामेय... हा घे! मस्त झणझणीत रस्सा कर, येतोच बघ परतून।.... सोडवून घे शिवा कडून! सीटच्या मागचा, दोन-एक किलोचा कोंबडा खिडकीतून बाहेर देऊन ड्रायव्हर, घरातून धावत बाहेर आलेल्या म्हातारीला म्हणाला. - मी करत नसते आता, उगाच....शिवा हाय व्हय इथं? - कायबी बोलतेस व्हय, स्वतः बघितला त्याला इथं मागचं. बोलऊन घे त्याला, येतोय बघ मी परतून.. डपंर निघाला. - आजोळ हाय माझं, आईच-मामाचं घर! एकाच गावात दोन्ही आहे बघा माझं, हे इथं माझं घर, ते माझं पोरगं! रस्त्याच्या कडेला असलेल्या दुसऱ्या एका घराकडे इशारा करून साहेब म्हणाले. - उतरा इथंच! गणपतीचं दर्शन घ्या, लय फेमस हाय, ऐकलं असेल 'वाईचा गणपती' म्हणून! मागून जुन्या पुलावरून जावा एसटी स्टँड वर, जवळ पडल. ३.३०/४ च्या दरम्यान निघतात गाड्या मुंबईकडे...का येताय परत, कोंबडं दिलंयच घरी. रस्त्याने चालत राहायचं, येणाऱ्या गाड्यांना हात दाखवायचा, भेटेल त्या गाडीने, टेम्पो/ट्रकच्या मागे, वडाप गाड्यांना लटकून प्रवास करायचा, खूप वर्षांनी असा ट्रेक केला, एक वेगळीच मजा असते याची. केंजळ उतरून खावली गावातून चालताना हे महाशय थां...