अरुणोदय झाला..मंगळगड/कंगोरीगडावर...(Trek to Mangal gad/Kangorigad)

शुक्रवार रात्र..का शनिवार? माहीत नाही, रात्री १२.३० च्या सुमारास झोपेतच फोन उचलला आणि... - येताय ना तुम्ही? - कुठे? - अहो रिझर्व्हरेशन आहे ना तुमचं?..गोठावली गाडीचा कंडक्टर बोलतोय मी. - हो उद्या आहे आज नाही.. - काय सर..शिकली सवरलेली माणसं तुम्ही...तारीख बघा तारीख...रात्री १२ नंतर बदलते ती! - नाही जमणार आता, डोंबिवलीला आहे. - बघा, पैसे परत मिळणार नाहीत आता. तब्बल रु. ५२० चा फटका घेऊन, स्वतःवर हसतं मी पुन्हा झोपलो. मंगळगड म्हणजेच कंगोरीगड पाहण्यासाठी, किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गोठावली गावासाठी असलेल्या रात्रीच्या एकमेव एसटी ची बुकिंग करून ठेवली होती. गाडी रात्री १२.३०ची असल्यामुळे, शनिवारी रात्री निघुन रविवारी ट्रेक करायचा प्लॅन होता पण तारखेचा गोंधळ झाला आणि पैसे गेले माझे! शनीवारी सकाळीच पुन्हा बुकिंग केली, या वेळी न चुकता तारीख रविवारची सिलेक्ट केली. नशिबाने शेवटच्या सीट वर दोन जागा मिळाल्या. शनिवारी रात्री ११ ला निघून, १२ वाजता पोहोचलो आम्ही ठाणे सीबीसी बसडेपोत. १२.३० ची ठाणे-गोठावली एसटी आम्हाला मंगळगडाच्या पायथ्याशी घेऊन जाणार होती. मं...