४२ विरगळी आणि निमगिरी-हनुमंतगड (Trek to Nimgiri and Hanumant gad)

वाढदिवसाच्या दिवशी तरी घरी रहा! हा उनाडपणा बस झाला आता! ५ वाजण्याच्या आत घरी नाही आलात....तर त्याचं डोंगरावर रहा! आदिवासी कुठचे! - इती - घराचा किल्लेदार..... उद्याच्या रविवारी, सचिनला ऑफिस मध्ये काम होतं आणि पुढचा म्हणजे महिन्यातला तिसरा रविवार, मला काही काम आहे. महिना वाया कसा घालवायचा म्हणून सचिन शनिवारी सुट्टी घ्यायला तयार झाला आणि मी माझा बर्थडे कोणत्यातरी गडावर हॅप्पी करायचं ठरवलं. '५ च्या आत घरात' यायची ताकीत होतीच म्हणून मग त्यातल्या त्यात जवळचे 'निमगिरी आणि हनुमंतगड' करायचं ठरवलं आणि सकाळी ४.३०लाच निघालो. मुरबाड-माळशेज घाट मार्गे आम्ही खंडीपाडा हे निमगिरीच्या पायथ्याचं गाव गाठलं. बाईक एका अंगणात उभी करून समोर डोंगरात दिसणाऱ्या किल्ल्यांच्या जोडगोळीची वाट धरली. शाळेच्या समोरून इलेक्ट्रिक टॉवर समोरून थोडं पुढे जाऊन एक विहीर पार करून आम्ही झुडुपात शिरलो. याच गर्द झाडीत काही विरगळी आणि हनुमानाच्या मंदिराचे अवशेष आहेत हे आम्ही वाचलं होतं पण ते परत येताना पाहू हणून आम्ही पुढे चालू लागलो. नेहमीच्या सवयीप्रमाणे वाट भटकलो आणि १५-२० मिनिट वाया घालवली. डोंगराच्य...