Posts

Showing posts from February, 2019

विहिरींचा मल्हारगड आणि मुरारबाजींचा पुरंदर..(Trek to Malhargad and Purandar fort)

Image
- अरे...गाडी घाल त्याच्यावर...लवकर! - अरे हो...ट्राय करतोय..नहीतर आपणच पडायचो... - उद्याची मस्त सोय होईल ****!....खोबऱ्यासरखं लुसलुशीत लागतं मटण... - गेला ****! जाऊदे...नाहीतरी परमिशन नाही आहे मारायची! काळेवाडीतून मल्हारगडाच्या पायथ्याशी जाणाऱ्या त्या निर्मनुष्य वाटेवर दोन वेळा ससा आमच्या बाईकच्या पुढे पळत होता. पण अथक प्रयत्यानंतरही या सशाने आमचे कासव केले आणि नाहीसा झाला. पुढे जाऊन या रस्त्याचं काम चालू होतं म्हणून खडींचे डोंगर रचून ठेवले होते. आजूबाजूला फक्त लख्ख काळोख दिसत होता. गुगल मॅप वर मल्हारगड टाकलं आणि त्याने झेंडेवाडीतून/कळेवाडीतून जाणाऱ्या; आजून काम चालू असलेल्या या रस्तावर आणून उभं केलं. काळेवाडीतून डावीकडे रात्री ३ च्या दरम्यान टर्न घेतला होता तेव्हा, आपल्या केस-दाढीहून पांढऱ्या धोतर-बंडी-टोपीतील आजोबा पिंपळाला प्रदक्षिणा घालत होते. ते आजोबा आणि तो पिंपळ या दोन जीर्ण गोष्टी सोडल्या तर बाकी सारा गाव झोपला होता. याच आजोबांना रस्ता विचारावा म्हणून ३.३० ला परत तिथेच आलो तर तिथे फक्त पिंपळ होता आजोबा नव्हते. एवढ्या रात्री कोणाचं दार वाजवायचा म्हणून मग गावापासून काही अंत...