Posts

Showing posts from December, 2018

परशुरामाची तपोभूमी...साल्हेर (Trek to Salher)

Image
काय करूया? साल्हेर-सालोटा आता होणार नाहीत! दोन तास बिहाइंड शेडुल आहोत आपण! मांगी-तुंगी करूया की मुल्हेर! समोर मांगी-तुंगी दिसत होता. रस्त्यावरचा बोर्ड साल्हेर ३० किमी दाखवत होता आणि याच मार्गावर मुल्हेर १३ किमी वर होता. बाईक कडेला लावून, या चौकात १० मिनिटं चर्चा केली आम्ही आणि शेवटी सलोट्यावर पाणि सोडून साल्हेर-महाराष्ट्रातील सर्वांत उंच किल्ला करायचं ठरवलं. आमचं प्लॅनिंग सालोटा-साल्हेरचं होतं म्हणूनच रात्री ११.३० वाजता डोंबिवली सोडली आणि सकाळी ६.३० ला ट्रेक सुरू करणार होतो. रात्री ३.३०ला, नाशिकच्या मुबई चौकात आपल्या ३चाकी घेऊन उभ्या असलेल्या मित्रांना रूट कन्फर्म करण्यासाठी थांबलो आणि आपुलकीची अधिक सक्तीची रेस्ट पदरात पाडून घेतली. पुढल्या वाटेवर, बाईकवर फक्त दोघंच जाणं 'खतरेसे खाली नही'; रस्ता सामसूम आहे आणि चोरांची/लुटारूंची भिती आहे. १० वर्षापूर्वीचे आम्ही (सोंडके) असतो तर दुर्लक्ष्य केलं असतं पण आता बाजूच्या एसटी स्थानकात अंथरूण टाकलं. सकाळी ५.३०ला बाईक परत सुरू केली पण या दोन तासांच्या झोपेत सालोटा आमच्या स्वप्नांत विरला. साल्हेर; परशुरामाची तपोभूमी! भगवान विष...