आजून एक भैरव! शिरपुंज्याचा...(Trek to Bhairavgad, Shirpunje)

पुढंचं कोन हाय??? मी!....मनातली सुप्त इच्छा तशीच ठेवून मी गप्प उभा होतो. भैरोबचा पुजारी, डोक्यावर कडुलिंबाच्या पाला ठेवून कौल लावत होता. देवाच्या डोक्यावर पाला तसाच राहिला तर इच्छा पूर्ण होणार आणि तो पडला तर अपूर्ण. माझ्याही काही इच्छा होत्या पण....राहूदेत... आज आम्ही होतो शिरपुंज्याच्या भैरवाच्या गुहेत. अखंड दगडात कोरलेला अश्वारूढ भैरोबा; समोर उभा पुजारी, खाली आशेने बसलेला गोतावळा आणि एक निरव शांतता. आज रविवार, भैरोबाचा वार म्हणून थोडे भाविक जमले होते. शिरपुंज्याचा भैरोबा म्हणजे पंचक्रोशीतल्या लोकांचे जागृत दैवत पण आम्ही मात्र गड पाहायला आलो होतो; भैरवगड. महाराष्ट्रातील ६ भैरवगडांपैकी एक; हरिश्चंद्रगडाच्या अंगणातील दुसरा आणि आम्ही पाहिलेला तिसरा...शिरपुंज्याचा भैरवगड. हरिश्चंद्रगडावर राजूर मार्गे येणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी हा गड उभारला होता. शिरपुंजे गावातील या गडावर भैरोबाचे मंदिर आहे, दर वर्षी आश्विन महिन्यात इथे जत्रा भरते आणि तीच आमंत्रणही आम्हाला मिळालं... पाव्हन! ४ तारखेला देवाची जत्रा आहे..३ तारकेला रात्रीचं या! डोंबिवलीवरून ४.३० निघून, इगतपुरीमार्...