सफर रामशेज आणि देहेरगडाची (Trek to Ramsej and Dehergad fort)

गड किल्ले राखावे, पराक्रमाचा तमाशा दाखवावा; राजश्री आबासाहेबांचे संकल्पित तेच आम्हास करणे अगत्य | कुठेतरी वाचलेलं, छत्रपती संभाजी राज्यांच्या एका पत्रातील हे वाक्य! शंभू राजे छत्रपती झाल्यावर त्यांच्या जीवनाचा आणि असाधारण मुत्युचाही आढावा घेतला असता, पदोपदी आपल्याला या वाक्याची प्रचिती येते. याचं शंभू राजांचा मुसद्दीपणा आणि आम्हा चिवट मराठयांचा इतिहास ठासून सांगणारा 'रामशेज', आमचा आजचा पहिला किल्ला. औरंगजेबाला सुमारे साडेपाच वर्ष झुंजवणारा आणि या लढ्यात हात हलवत माघार घ्यायला लावणारा...रामशेज. हा किल्ला जरी लहान असला तरी त्याचा इतिहास खूपच मोठा आहे. शहाजहान हा जेव्हा शहाजीराज्यांच्या विरोधात दक्षिणेत उतरला तेव्हा त्याने त्याच्या दख्खन मोहिमेचा मुहूर्त 'रामशेज' हा निजामशाहीचा किल्ला घेऊन केला. आपल्या वडिलांचा तक्ता गिरवत औरंगजेब, महाराज्यांच्या मृत्यूनंतर, स्वराज बुडवायला आपली साडेपाच लाखांचं सैन्य घेऊन उत्तरेतुन निघाला. दख्खन मोहिमेची सुरवात रामशेज घेऊन करायचा त्याचा मानस होता. मुघलांच्या ताब्यातील गुलशनाबाद (नाशिक) पासून १० मैलावर असलेला 'रामशेज...