सफर तळगड, घोसाळगड आणि कुडा लेण्यांची (Trek to Talgad, Ghosalgad and Kuda Caves)

रघुनाथ बल्लाळ(कोरडे) सबनीस सात पाच हजार मावळे खळक पाइचे घेऊन राजापुरीवर चालिले त्यांनी जाऊन राजापुरी पावेतो तळे, घोसाळे कुल देश मारुन सरद दरियाकिनारा मोकळा केला. - सभासद बखर प्राचीन काळापासून कोकणातील मादांड बंदरात उतरणारा माल कुंडलिका नादिमार्गे घाटमाथ्यावर नेला जात असे. या व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी तळगड, घोसाळगड, अवचितगड, ताम्हणघटमार्गे घनगड असे किल्ले बांधण्यात आले. हे सारेच किल्ले आजही आपल्या इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. शिवाजी राज्यांनी १६४८ मध्ये आदिलशहकडून तळगड घेतला. याचबरोबर निजमाकडून घोसाळगड जिंकून राजांनी त्याला 'विरगड' असं नाव दिलं. पुढे १६५९ मध्ये सिद्दीने तळगड आणि घोसाळगडला वेढा घातला, पण महाराजांनी अफजल खानाचा वध केल्याची बातमी ऐकून सिद्दीला वेढा उठवून निघून जावं लागलं. पुरंदरच्या तहामध्ये राजांनी जे १२ किल्ले आपल्याकडे ठेवले त्यात ‘ तळगड, घोसाळगड’ हे किल्ले होते, त्याचवरुन या गडाचे तत्कालीन महत्व लक्षात येते. अवचितगड गेल्या वर्षी केला; घनगड, ताम्हिणीघाट अगोदरच केला होता. हे दोन्ही; तळा-घोसाळा, गेल्यावेळी राहून गेले होते; म्हणून या ...