पद्मदुर्ग...अजिंक्य जंजिऱ्यावरची जरब! (Padmdurg, Murud)

- पुढची वारी कुठे?? - पद्मदुर्ग ! - किल्ला आहे का हा? कुठे? - अरे..जंजिरा पाहीलाय का? तिथेच आहे, बाजूला! - जंजिरा...दोनदा गेलोय...मराठयांच्या दोन्ही महाराज्यांना घेता नाही आला तो सिद्दीचा अजिंक्य किल्ला ना...त्याच्या बाजूचा तो लहानसा किल्ला का! असा....जंजिरा आजही अजिंक्यच राहिला आहे आणि खुद्द राजांनी बांधलेला पद्मदुर्ग मात्र...अपरिचित! पनवेल पासून लावलेले जंजिऱ्याचे मार्गदर्शक फलकांनी (राज्यांच्या फोटोबरोबर) त्याला प्रसिद्धी मिळवून दिली पण बाजूचाच पद्मदुर्ग मात्र दुर्लक्षित राहिला. जंजिरा...नो डाऊट..अभेद्य किल्ला, आजही जोमाने उभा असलेला पण..माझ्या लेखी...त्याचा अभेद्यपणा इतिहासात उभा राहिलाय तो फक्त धाडसी आणि कडव्या मराठ्यांच्या धडकेमुळेच.... राज्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर...'पद्मदुर्ग वसवून राजापूरीच्या (जंजिरा) उरावरी दुसरी राजापूरी केली आहे’. जंजिऱ्याच्या सिद्दीच्या कोकणाला होणाऱ्या उपद्रवला आळा घालण्यासाठी राजांनी मुरुडजवळ टेकडीवर 'सामराजगड' बांधला. या किल्ल्याने सिद्दीच्या जमिनीवरील हालचालींवर नियंत्रण आले आणि समुद्रातील हाल...