Posts

Showing posts from March, 2018

मोरोशीचा भैरव...(Trek to Bhairavgad, Moroshi)

Image
डाईक... म्हणजे बेसॉल्ट खडकाची उभी भिंत. ज्वालामुखीचा लाव्हारस वैशिष्टपुर्ण पद्धतीने बाहेर उडून; थंड होऊन तयार झालेला कातळकडा.  सह्याद्रीची रचनाच मुळी ज्वालामुखिच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लाव्हारसामुळे झालेली आहे. यातील 'डाईक' पद्धतीच्या पर्वतरचनेच उत्तम उदाहरण म्हणजे 'मोरोशीचा भैरवगड'....आमची आजची मोहीम... भैरवगडच्या बालेकिल्ल्याची ४०० फूट उंचीची, मुख्य डोंगररांगेतून वेगळी उभी राहिलेली अजस्त्र आणि खडी कातळभिंत नेहमीच आमचे लक्ष वेधून घ्यायची. पण जरा जास्तच टेक्निकल असल्यामुळे आम्ही दोघांनी(फक्त) हात टाकायची रिस्क घेतली न्हवती. सरतेशेवटी आम्ही या ट्रेकसाठी 'स्मॉल स्टेप ऍडव्हेंचर' (http://www.smallstepsadventures.com) चा इव्हेंट जॉइन करायचं ठरवलं आणि अनेक वर्षांची इच्छा पूर्ण करून रविवार सार्थकी लावला. अगोदर ठरल्याप्रमाणे सकाळी ५.३० ला मोरोशी गाव गाठण्यासाठी ४ च्या ठोक्याला घर सोडलं. डोंबिवली वरून जवळजवळ ७८ किमीवर, कल्याण-मुरबाड-माळशेज रस्तावर हे गाव आहे. बाईकवर असताना सकाळी ४.३० पासूनच, विनायक (ट्रेक लीड) चे फोन यायला सुरुवात झाली. जवळपास १०...