Posts

Showing posts from November, 2017

नागेश्वर आणि जोडीला वासोटा..सतरा वर्षांनंतर पुन्हा (Tough Day - Trek to Nageswar to Vasota)

Image
सन २००१, नागेश्वरचा एक कातळटप्पा - विनू - मला *** बनवलं; एक डोंगर सांगून ३ डोंगर चढवले!!! सचिन - अरे आलो आता..आजून ५ मिनिट फक्त! नरेश - हे बोरकूट खा!! दम नाही लागणार!! विकी - अरे चला रे लवकर!! आजून नागशीत लांब आहे.... १७ वर्ष झाली!! पहिला ट्रेक; सचिनने फसवून घडवलेला!! विनू आणि नरेशचा बहुतेक शेवटचाच! २००१ ची मे महिन्याची दुपार, पार दमलेला विनू, गळ्यात बोरकूटची माळ घेऊन उभा नरेश; आमचा सगळ्यांचा गुरू सचिन, मी आणि ३६चा कोड्याक. फोटोज आहेत आजून नरेशकडे....बघून पोट धरून हसण्यासाठी!! नागेश्वर; चोरवणे आणि परिसरातली १५ गावं यांचं जागृत देवस्थान; बाराही महिने इथल्या शिवलिंगाला अभिषेक चालू असतो, गुहेच्या कातळ छतातून, तेही गुफेच्या शेंड्यावर पाण्याचा काहीही  स्रोत नसताना.. निसर्गाचं एक आश्चर्यच!! इथे जाण्याचा आज पुन्हा योग आला वासोट्याच्या ट्रेकच्या निमित्ताने. खरं तर मला वासोटा (व्याघ्रगड) करायचा होता. तो सताऱ्यातून सोपा आहे आणि सगळेच करतात; म्हणून मग 'नागेश्वर ते वासोटा वन डे' करू म्हटलं पण हा ट्रेक माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच जड गेला. पनवेलला धावपळ करून रात...