Posts

Showing posts from August, 2017

सफर सुरगड आणि मानगडची (Trek to Surgad and Mangad)

Image
पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटी कुंडलें बरीं । सुवर्ण कटि कांसोटी घंटा किंकिणि नागरा ॥ असे हनुमानाचे ध्यान समर्थांना दिसते. समर्थांच्या मते, हनुमान हा समाजाचा संरक्षण मंत्री, म्हणूनच आपण त्याला गावाच्या वेशीवर बसवलेला; खूप पूर्वीपासूनच. मारुतीची विरमुद्रा मूर्ती जवळ जवळ प्रत्येक गडावर दिसते. या मूर्तींच्या शेपटीचे टोक गडाचा माथा दर्शवतात अगदी 'पुच्छ ते मुरडिले माथा' या ओळीला अनुसरून. गड-किल्ले पाहणाऱ्यांसाठी ही खूणचं. आजपर्यंत पाहिलेल्या मारुतींपैकी सर्वात मोठी मूर्ती मी 'सुरगडावर' पाहिली. चेहऱ्यावर राकट भाव, मिशी, कमरेला खंजीर असलेली आणि पायाखाली पनवती राक्षसीणीला चिरडलेली मूर्ती  खरच 'भीमरूपी महारुद्र' होती. गेल्या वर्षी आम्ही कुंडलिका नदीचा उगम म्हणजे 'भीरा' गाव (देवकुंड) आणि ती अरबी समुद्राला मिळते तो किल्ला म्हणजे कोर्लई हे दोन्ही पाहिले. कुंडलिका ही कोकणातली एक प्रमुख नदी. प्राचीन काळा पासून या नदीतून व्यापार चालत असे. घाटावर जाणारा माल विविध (ताम्हणी, थळ घाट इत्यादी) घाटमार्गंनी घाटमाथ्यावरील बाजारपेठेत जात असे. याच व्यापारी मार्गांचे रक्षण...