कोंकण किल्ल्यांची सफर...भवानीगड, कर्णेश्वर, महिमतगड, कोळकेवडी दुर्ग, गोपाळगड, गोविंदगड-गोवळकोट ( Trek to konkan range...Bhavanigad, Karneshwar, Mahimatgad, Kolkevadi, gopalagad, govindgad-Govalkot )

आम्ही दऱ्या-डोंगरचे राहणार, चाकर शिवबाचे होणार.... सचिनच गाणं.....ट्रेकभर गुणगुणत होता हा गडी. पूर्ण गाणं फार सुंदर होतं. पुन्हा कधीतरी पाठ करून लिहीन, तोपर्यंत आमच्या या वर्षीच्या पहिल्या ट्रेक बद्दल.... शाळा कॉलेजातली जवळजवळ प्रत्येक उन्हाळी सुट्टी माझ्या ज्या कोकणातल्या घरात घालवली, त्याच्याच अंगणात पसरलेल्या काही गडांना भेट देण्याची इच्छा अनेक दिवसांपासून होती. आभ्यास करून काही जागा हेरल्या आणि दोन दिवसांची मोहीम आखली. खर सांगायचं तर ही ठिकाणं इतकी सुंदर असूनही दुर्लक्षित वाटली, सहाजीकच...कोकणातील आहेत ना म्हणूनच!! आमच्या कोकणच्या मोहिमेची सुरवात आम्ही रत्नागिरीतील काही दुर्ग, किल्ले आणि पुरातन मंदिरापासून करायचं ठरवल; भवानीगड, कसबा कर्णेश्वर मंदिर, महीमतगड, कोळकेवाडीदुर्ग, गोपाळगड आणि गोविंदगड (गोवळकोट); पैकी महीमतगड हा माझ्या गावापासून हाकेच्या अंतरावर आणि तरीही मला आजपर्यंत अज्ञात. त्या वयातली आणि त्या सुट्टीतली आमची आवड आंबा/फणस, बॅट/बॉल, एकत्र आलेले भाऊ/बहिणी यापलीकडे कधी गेलीच नाही म्हणून असेल बहुतेक. उन्ह्याल्याच्या सुट्टीत आंब्यानी बहरलेल्या झाडावर दगड म...