Posts

Showing posts from March, 2017

Trek to Colaba and Korlai fort - सह्याद्री, समुद्र आणि शिवराय !; सफर कुलाबा आणि कोर्लईच्या किल्ल्याची,

Image
सह्याद्री, समुद्र आणि शिवराय यांनी एकवटून मांडलेला स्वतंत्र संग्राम विजयी झाला! हिंदवी स्वराज्य साकार झालं.... - शिवकल्याण राजा पनवेल वरून सकाळी श्रीवर्धन डिपोची एक एस.टि. आमच्या पुढे-पुढे कोकणात शिरत होती. एक भारी टॅग-लाईन लिहली होती तिच्यावर..."इलका तुमचा, दरारा आमचा". आमची आजची सफर कुठेतरी या लाईनशी कनेक्ट होत होती. भारताच्या इतिहासात कोकण प्रांताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आर्यांच्या आगमनापूर्वीसुद्धा पश्‍चिम समुद्राच्या बंदरावर विदेशी जहाजे व तारवो व्यापारासाठी येत असत. १६५७च्या आसपास कल्याणमधील दुर्गाडी येथे पहिला जहाज बांधणीचा प्रयत्न राजांनी केला तेंव्हा कोकणच्या संपूर्ण किनारपट्टीवर इंग्रज, पोर्तुगीझ, सिद्दी, काही प्रमाणात मुघल आणि आदिलशाहाचे वर्चस्व होते. 'ज्याचे आरमर त्याचा व्यापार' हे हेरून आपल्या समुद्रात आपले आरमार उभारायची दुरदृष्ट्री फक्त राजांनी दाखवली. १६५६ मध्ये मोऱ्यांची जावळी मारून राजे कोकणात उतरले. पुढील एका वर्षात कल्याण-भिवंडी परिसर घेऊन उत्तर कोकण काबीज केले. पोर्तुगीज, इंग्रज, सिद्दीवर अंमल आणायचा असेल तर त्यांच्या इतकेच बलवान...