Trek to Devkund, Bhira Dam - एक 'ऊनाड' दिवस...देवकुंड

सांग सख्यारे आहे का ती, अजून तैशीच गर्द राईपरी. शाळा/कॉलेज्यातल्या तिची आठवण करून देणारी दाट वनराई...फाल्गुनातल्या हिरव्या/पिवळ्या/तपकिरी झालेल्या झाडांची, फुललेला गुलमोहोराची, पक्ष्यांच्या मंजुळ किलबिलाटांची आणि रानभर पसरलेल्या कारवंदांच्या फुलांच्या सुवासाची. हाच अनुभव होता आजच्या ट्रेकचा; देवकुंडाचा. हा स्पॉट आणि त्याचे फोटोज जवळजवळ दीड वर्षांपूर्वी पहिल्यांदा पाहिलेले. प्रत्यक्ष जाण्याचा योग आज जुळून आला. 'डाव्या बाजूला भिरा धरणाचं निळक्षार पाणि, उजव्या बाजूला काळाकुट्ट कातळकडा, पायाखाली तपकिरी/गुलाबी पानांचं कार्पेट आणि डोक्यावर गच्च झाडांच्या पानांतून डोकावणाऱ्या सूर्यप्रकाशाच झुंबर' या सर्वांनी नटलेली पायवाटा ह्याही आम्हाला आकर्षित करणाऱ्या, फोटोत पाहिलेल्या त्या दवकुंडापेक्षा कमी नव्हत्या. या नुकत्याच सुरु झालेल्या गरमीच्या मोसमात असाच ट्रेक करणं बरं; सोपा, मुबलक पाणी, आणि शेवट देवांच्या बाथटब मध्ये...देवकुंड! गेले दीड वर्ष 'आज-उद्या' करता करता '...