Trek to Kaladgad and Bhairavgad - दोन भैरोबा...सफर कलाडगड आणि भैरवगडची....
"ट्रेक! हं....अरे हरिश्चंद्रगड केलाय मी हरिश्चंद्रगड!!!". अस सांगणारे अबालवृद्ध आजकाल अनेकजण भेटतात. जसे फॅशनष्चे ट्रेंडस असतात, तसा हरिश्चंद्रगड हा गेल्या काही वर्षांपासून 'इन ट्रेंड' आहे. आठवड्याच्या शेवटी तर जत्रा असते गडावर ज्यात 'फक्त ट्रेकर्सच नसतात'. हा गड इतका कॉमन झाला आहे की, अगदी नवीन मंडळींनाही गाईड किंवा एखांदा अनुभवी ऑर्गनायझिंग ग्रुप लागत नाही. आम्हीही तो खूप वेळा केला आहे पण निरनिराळ्या वाटा अनुभवण्यासाठी....कधी टोलरखिंडीतून, कधी जुन्नर दरवाजा, कधी पाचनईतून तर कधी नळीच्या वाटेने तरीही वर पोहोचल्यावर पाहिलेली 'गडावरची हि वर्दळ चांगली कि वाईट?' या प्रश्नाच उत्तर मला अजूनही स्वतःला देता आल नाहीय. असो! याच हरिश्चंद्राच्या वालयात दुर्लक्षित झालेले आणि तरीही स्वतःच अस्तित्व वेगळ बाळगणारे दोन गड आम्ही काल केले...'कालाडगड आणि भैरवगड', पैकी कालाडगड हा ट्रेकिंगच्या कठीण श्रेणीत मोडणारा असून कोळथ्याचा भैरव हा सोपा आहे. कलाडगड - एका दिवसात दोन गड करायचे असल्याने आम्ही आदल्या दिवशी रात्री ११ वाजता निघालो. डोंबिवलीतून निघताना ओझ वाटणा...