Posts

Showing posts from November, 2016

Trek to Morgiri and Tung Fort - सफर दुर्गम मोरगिरी आणि तुंगची

Image
सफर दुर्गम मोरगिरी आणि तुंगची.. दरवेळी ट्रेकसाठी नविन ठिकाण कुठे शोधायच, असा प्रश्न हा सहयाद्री पडू देत नाही हेच आमच्यासारख्या भटक्यांचं अहोभाग्य! महिन्यास एक या दराने जरी कोणी उनाड जगला तरी त्याला आयुष्यभर पुरून उरतील हे सह्यकडे..... ऑफिसकामाचा कंटाळा आलेल मन रमवण्यासाठी आम्ही निवडला 'मोरगिरी'. 'तुंग' किल्ल्याची सफर संपवताना, सचिनने खूप दिवसांपूर्वी हेरून ठेवलेला. मोहीम ठरली पण माहिती कुठेच मिळेना; अगदी गुगलवरही नाही. गडाच्या उंचीबद्दल देखील कुठे वाचायला मिळाल नाही पण सचिनच्या अंदाजानुसार तुंगपेक्षा वरचढच असेल. आडवाटेला असल्यामुळेच बहुतेक  मावळातील या दुर्गम शिखराकडे भटक्यांनी दुर्लक्ष केल असाव. मग काय, म्हटलं बघू त्या रेंज मध्ये गेल्यावर आणि लावली स्याग पाठीला आम्ही दोघांनी... सकाळी ५ च्या ठोक्याला निघून आम्ही लोणावळा मार्गे 'अॅम्बी व्हालीचा' रस्ता धरला. अॅम्बी व्हालीच्या जवळपास ८ किलोमीटर अगोदर, 'घुसळखांबवरून' डावीकडच्या तुंगसाठीच्या रस्तावर वळलो. थोड पुढे गेल्यावर, तुंगचा रास्ता सोडून 'एस्सार अॅग्रोटेक' फाट्यावरून उजवीकडे वळलो 'मो...